Vinisha Umashankar Dainik Gomantak
ग्लोबल

COP26 शिखर परिषदेत 14 वर्षीय भारतीय मुलीने जागतिक नेत्यांना सुनावले खडे बोल

विनीशाच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

स्कॉटलंडमधील (Scotland) ग्लासगो येथे झालेल्या COP26 क्लायमेट चेंज समिटमध्ये (COP26 Climate Change Summit) एका 14 वर्षीय भारतीय मुलीच्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे. तामिळनाडूच्या विनिशा उमाशंकर (Vinisha Umashankar) यांनी हवामान बदलासंबंधी (Climate Change) आपल्या भाषणामध्ये म्हटले आहे की, 'आमची पिढी सध्याच्या जागतिक नेत्यांमुळे संतप्त आणि निराश आहे. कारण जागतिक नेत्यांनी पर्यावरणाबाबत पोकळ आश्वासने दिली.' 'अर्थशॉट प्राइज' च्या अंतिम फेरीतील विनिशा उमाशंकर हिला प्रिन्स विल्यम यांनी हवामान शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. विनिशा पुढे म्हणाली की, ही वेळ चर्चेची नाही तर भविष्यासाठी पावले उचलण्याची आहे. विनीशाच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित होते.

विनिशा उमाशंकर पुढे म्हणाली, 'आज मी सर्वांना विनंती करुन सांगते आपण बोलणे सोडून कामाला लागावे. अर्थशॉट पारितोषिक विजेते आणि अंतिम स्पर्धकांना तुम्ही आमच्या नवकल्पनांना, प्रकल्पांना आणि उपायांना समर्थन देण्याची गरज आहे. आम्हाला जीवाश्म इंधन, धूर आणि प्रदूषणावर उभारलेली अर्थव्यवस्था नको आहे. आपण जुन्या वादविवादांवर आता विचार करणे थांबवले पाहिजे, कारण आपल्याला नवीन भविष्यासाठी नवीन विचार आणि दृष्टीकोन आवश्यक आहे. त्यामुळे आपले भविष्य घडवण्यासाठी तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत गुंतवणे आवश्यक आहे.

विनिशा म्हणाली, 'आम्हाला आशा आहे की आपण जुनी विचारसरणी आणि सवयी सोडण्याचा प्रयत्न करु. जेव्हा आम्ही तुम्हाला आमच्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो, तेव्हा आम्ही देखील पुढाकार घेऊ. तुम्ही हवामान बदलासंबंधी उशीर केला तरी आम्ही काम करु. तुम्ही भूतकाळात अडकलात तरीही आम्ही भविष्य घडवू. कृपया माझे आमंत्रण स्वीकारा. मी तुम्हाला खात्री देतो की, तुम्ही तुमच्या निर्णयाने निराश होणार नाही.

विनिशा सौर उर्जेवर चालणारी स्ट्रीट इस्त्री कार्ट अर्थशॉट पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचली. विनिशा पुढे म्हणाली, “जेव्हा हवामान बदलाचा प्रश्न येतो, तेव्हा कोणतेही स्टॉप बटण नसते. मला काम करायचे आहे मी फक्त भारतातील मुलगी नाही. तर मी पृथ्वीची मुलगी आहे. मी एक विद्यार्थी, इनोवेटर, पर्यावरणवादी आणि उद्योजक देखील आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी एक आशावादी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT