Pakistan-Afghanistan Border Dainik Gomantak
ग्लोबल

Video: पाकिस्तान सीमेवर हजारो अफगाणी जमले, चेंगराचेंगरीत चार लोकांचा मृत्यू

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर (Pakistan-Afghanistan Border) हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक गर्दी करु लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) राजवट पुन्हा आल्याने नागरिकांमध्ये (Citizens) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक हजारोच्या संख्येने अफगाणी नागरिक शेजारी असणाऱ्या देशांमध्ये पलायन करु लागले आहेत. काबूल विमानतळ (Kabul Airport) बंद झाल्यानंतर आता लोकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेणे सुरु केले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर (Pakistan-Afghanistan Border) हजारोंच्या संख्येने अफगाणी नागरिक गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे सीमेवर चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील एका पत्रकारानेही या परिस्थितीचा एक विदारक व्हिडिओ शेअर केला आहे.

पाकिस्तानने चमन बॉर्डर क्रॉसिंग (Chaman Border Crossing) तात्पुरते बंद केल्यावर चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे. ही सीमा अफगाणिस्तानमधील कंधार प्रांतातील स्पिन बोल्डकला पाकिस्तानच्या चमन शहराशी जोडते. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, लोकांचा जमाव पाकिस्तानात घुसू इच्छित असल्याचे दिसत आहे. पत्रकार शिरजाद म्हणाले, 'हे दृश्य जास्तच विदारक आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा बंद आहे. यातच सीमेवर गर्दी झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या हजारो महिला आणि मुले सीमेजवळ झोपलेले आहेत.

काय म्हणाले पाकिस्तानी मंत्री?

याआधी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद (Sheikh Rashid Ahmed) यांनी चमन सीमा काही दिवस बंद ठेवण्याचे संकेत दिले होते. त्यांनी यामागे सुरक्षेचे कारण सांगितले होते. मात्र, किती दिवसांसाठी सीमा बंद राहील हे मंत्र्यांनी मात्र सांगितले नव्हते. अमेरिकन न्यूज वेबसाइट सीएनएनने पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, बुधवारी पाकिस्तानने सुमारे 5,000 अफगाण नागरिक स्पिन बोल्डकमध्ये सीमेवर क्रॉसिंग करु दिले जात नव्हते.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेले लोक

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान ताब्यात घेतला. या दिवसापासून, अमेरिकेसह इतर देशांनी तालिबानविरुध्दच्या युद्धात परदेशी सैनिकांना मदत करणारे सैनिक, नागरिक, कर्मचारी आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. ही समयसीमा 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यानंतरही मोठ्या संख्येने लोक अजूनही येथे अडकले आहेत. अमेरिकेचे शेवटचे विमान उड्डाण होताच तालिबानने काबूल विमानतळावर कब्जा केला, त्यानंतर त्याचे ऑपरेशन बंद करण्यात आले आहे. आता लोक आपली मातृभूमी सोडून पळून जाण्यासाठी पाकिस्तान, चीन, इराण आणि मध्य आशियाई देशांसह शेजारील देशांकडे वळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT