Maulana Sher Bahadur Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: भारताच्या दुश्मनाचा अज्ञाताने काढला काटा, दहशतवादी समर्थक मौलाना शेर बहादूरच्या छातीची चाळणी

Maulana Sher Bahadur: काही दिवसांपूर्वी भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेला आणि लष्कर-ए-तैयबासाठी दहशतवाद्यांची भरती करणारा कमांडर अक्रम खान याची बाजौरमध्ये हत्या करण्यात आली होती.

Ashutosh Masgaunde

Video of Terrorist supporter Maulana Sher Bahadur was killed by unknown persons in Peshawar, Pakistan:

पाकिस्तानातील पेशावरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा जवळचा मौलाना रहिमुल्ला तारिक याचीही काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती.

ही हत्या अज्ञात लोकांनी केली असून, पाकिस्तान पोलीस गुन्हा नोंदवून तपास करत आहेत.

अलीकडे पाकिस्तानात लपलेले अनेक दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचे समर्थक मारले गेले आहेत. आता यामध्ये मौलाना शेर बहादूरचे नाव जोडले गेले आहे, जो जैश-ए-मोहम्मदचा समर्थक होता.

शेर बहादूरची खैबर पख्तुनख्वा, पेशावर येथे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जैशचा आणखी एक दहशतवादी युनूस खान जो दहशतवादी संघटनेसाठी भरती करत असे, त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय मौलाना रहीमुल्लाह याच्या हत्येनंतर काही दिवसांतच या घटना उघडकीस आल्या आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्येही अशा गूढ हत्येवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र अद्याप काहीही समोर आलेले नाही.

पाकिस्तानातील पेशावरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा समर्थक मौलाना यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे. मौलानाचे नाव शेर बहादूर असे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शेर बहादूरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

वृत्तानुसार, शेर बहादूरची खैबर पख्तूनख्वा, पेशावरमध्ये हत्या करण्यात आली होती. याशिवाय जैशचा आणखी एक दहशतवादी युनूस खान जो दहशतवादी संघटनेसाठी भरती करत असे, त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेला आणि लष्कर-ए-तैयबासाठी दहशतवाद्यांची भरती करणारा कमांडर अक्रम खान याची बाजौरमध्ये हत्या करण्यात आली होती.

ही टार्गेट किलिंग पाकिस्तानसाठी एक कोडे बनले आहे. दहशतवाद्यांशी संबंध असलेले आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानमध्ये अशा लोकांना मारले जात आहे. मात्र, अशा खुनामागे कोणाचा हात आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अलिकडे अनेक हल्ले झाले आहेत ज्यात जैश आणि लष्कर सारख्या बड्या दहशतवादी संघटनांचे मोठे नेते सामील आहेत. मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, आझाद अहमद, बशीर अहमद पीर, शाहिद लतीफ, सय्यद खलील रझा यांना अशाच अज्ञात हल्लेखोराने ठार केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Today's Live Updates Goa: ...तर मी चाललो मांद्रेत ! मायकल लोबोंचे वेगळ्या राजकारणाचे स्पष्ट संकेत

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

SCROLL FOR NEXT