SpaceX Dainik Gomantak
ग्लोबल

Video: एलन मस्क यांच्या SpaceX ने रॉकेटसह 53 सॅटेलाइट केले लॉन्च

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची स्पेस कंपनी स्पेसएक्स (SpaceX launch rocket) ने शनिवारी सकाळी (Indian time) रॉकेटद्वारे 53 उपग्रह प्रक्षेपित केले.

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची स्पेस कंपनी स्पेसएक्स (SpaceX launch rocket) ने शनिवारी सकाळी ( Indian time) रॉकेटद्वारे 53 उपग्रह प्रक्षेपित केले. ते कॅलिफोर्नियामधील स्टारलिंक इंटरनेट कॉन्स्टेलेशनसाठी लॉन्च केले गेले आहेत. दोन टप्प्यातील फाल्कन-9 रॉकेटने दुपारी 2:37 वाजता वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेसवरुन उड्डाण केले. काही मिनिटांनंतर, रॉकेट त्याच्या पहिल्या टप्प्यात ड्रोनशिपवर उतरले. जे प्रशांत महासागरात स्थित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ते पृथ्वीच्या कक्षेत पोहोचण्यासाठी उड्डाण करत राहिले.

दरम्यान, सुमारे तासाभरानंतर उपग्रह शेड्यूल केले होते. SpaceX ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या प्रक्षेपणाचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये हे भव्य दृश्य पाहायला मिळते. त्याच्या कॅप्शनमध्ये 'लिफ्ट ऑफ' असे लिहिले आहे. हे ट्विट नंतर कंपनीचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांनी रिट्विट केले. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर SpaceX ने लिहिले, 'SpaceX ने शनिवारी, 14 मे रोजी फ्लोरिडा येथील स्पेस फोर्स स्टेशनवरुन 53 उपग्रहांसह Falcon 9 लाँच केले.'

2500 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित

रिपोर्ट्सनुसार, SpaceX ने आतापर्यंत 2500 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. स्टारलिंक ही अंतरिक्ष आधारित सिस्टम आहे, जी अनेक वर्षांपासून विकसित केली जात आहे. जेणेकरुन इंटरनेट सेवा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकेल. शुक्रवारी, SpaceX ने घोषणा केली की, आमची उपग्रह इंटरनेट सेवा आता 32 देशांमध्ये उपलब्ध आहे. स्टारलिंकने ट्विटरवर यासोबतचा नकाशाही शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडून जगभरातील सेवांची माहिती घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT