वाढदिवस करताना तलवारीने केक कापल्यामुळे काही वेळा कारवाई झाल्याचे आपण ऐकले असेल. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ तलवारीने केक कापतानाचा आहे, इंग्लंडच्या राणीचा! (Queen of England) सध्या जी-7 राष्ट्रांची परिषद (Conference of G-7 nations) सुरु असून, या दरम्यान एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंग्लंडच्या राणीच्या हस्ते केक कापण्यात आला. मात्र केक कापण्यासाठी चाकू असताना राणीने तलवारीने हा केक कापला. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चांगल्याचं प्रतिक्रिया देत आहेत. (Video Awesome The Queen of England cut the cake with a sword)
ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा, अमेरिका आणि जपान या देशांचा सहभाग असलेली जी-7 परिषद सुरु आहे.तीन दिवसांची नैऋत्य इंग्लंडमध्ये (southwest England) परिषद चालणार असून, या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'द डचेस ऑफ कॉर्नवाल' (The Duchess of Cornwall) नागरिकांनी एकत्र यावं, तसेच सोबत जेवण करावं आणि मित्रत्वाचे संबंध दृढ करावे, अशा हेतूने या क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला इंग्लंडच्या राणीने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. देशात कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योध्द्यांच्या (Corona Warriors) कामाची स्तुती करत राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) यांनी आभार मानले. यावेळी त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यांनी सुरक्षा गार्ड करुन तलवार मागवून घेतली. केक कापण्यासाठी चाकू असल्याचे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले असतानाही राणीने तलवारीनेच केक कापला.
हा प्रसंग कॅमेरात कैद झाला आहे. जेव्हा राणी एलिझाबेथ यांना चाकू टेबलवर असल्याचे सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी मला माहिती आहे, असं म्हणत त्यांनी तलवारीनेच केक कापला. सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.