आज सकाळी कपिसा (Kapisa) प्रांतातील निजरब जिल्ह्यात (Nijrab district) अमेरिकन सैन्याने (America Army) केलेल्या बी -52 हवाई हल्ल्यात (Airstrike) कमीतकमी 11 तालिबानी (Taliban) सदस्य मारले गेले.असल्याची बातमी टोलो न्यूज या वृत्त संस्थेने दिली आहे.
गेले अनेक दिवसांपासून तालिबान अफगाणिस्तानमध्ये आपले पाळेमुळे रचत आहे अनेक हल्ले करत अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतात कब्जा मिळवला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
तर दुसरीकडे तालिबान लढाऊंविरोधात आक्रमणे सुरू ठेवत, अमेरिकेच्या समर्थित अफगाण हवाई दलाने सोमवारी विविध प्रांतांमध्ये तालिबानच्या छुप्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आणि 100 हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटच्या मालिकेमध्ये म्हटले आहे की, सोमवारी हेलमंड आणि कंधार प्रांतांच्या विविध क्षेत्रांमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
अफगाण संरक्षण मंत्रालयाने ट्विट करत या हल्ल्याची माहिती दिली आहे. काल रात्री दंड, झेरिया, तख्तपोल जिल्हे आणि कंधार प्रांतीय केंद्राच्या बाहेरील भागात हे हल्ले केले असल्याचा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे या हवाई हल्ल्यात 47 तालिबानी दहशतवादी ठार झाले असून 25 जण जखमी झाले आहेत. असेही सांगण्यात येत आहे.
हेलमंदच्या बाहेरील भागात झालेल्या आणखी एका हवाई हल्ल्यात 10 तालिबान लढाऊ मारले गेले, ज्यात झरगाई, हाजी तुरान आणि जरकावी नावाच्या तीन वरिष्ठ कमांडरचा समावेश आहे, असे देखील संरक्षण मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमेरिकन हवाई दलाच्या पाठिंब्याने अफगाण सैन्याने तालिबानच्या विरोधात प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे जी अमेरिकन सैन्याच्या औपचारिक निर्गमन होण्यापूर्वी देशातील सक्रिय भाग ताब्यात घेत आहे.लष्कर गाह आणि आजूबाजूला जोरदार लढाई झालीअसून अमेरिकन आणि अफगाणिस्तान सरकारच्या दोन्ही हवाई दलाने शहरात हवाई हल्ले केले आहेत. असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार तालिबानने शहराच्या 10 पोलिस जिल्ह्यांपैकी नऊवर नियंत्रण ठेवले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.