William J. Burns
William J. Burns Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिका-तालिबान यांच्यात पडद्यामागे शिजतेय 'खिचडी'; सीआयए प्रमुखांची गुप्त वार्ता

दैनिक गोमन्तक

तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर वेगाने जागतिक राजकिय समीकरणे बदलू लागली असतानाच अमेरिका (America) आणि तालिबान यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु झाली आहे. तालिबानचे प्रमुख नेते अब्दुल गनी बरदार (Abdul Ghani Baradar) यांच्याशी अमेरिकेच्या सीआय प्रमुखांनी सोमवारी काबूलमध्ये भेट घेतली आहे. दोन्ही बाजूंकडून या उच्चस्तरीय गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला. यामुळे देशाचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांना संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये पळून जावे लागले.

वॉशिंग्टन पोस्टने एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सीआयएचे संचालक विल्यम जे. (William J. Burns) यांची अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यानंतर अमेरिका आणि तालिबान यांच्यात पहिली उच्चस्तरीय बैठक पार पडत आहे. पोस्टच्या रिपोर्टनुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी आपले सर्वोच्च गुप्तहेर आणि परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ बर्न्स यांना तालिबानशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवले आहे. काबूलमधून लोकांना बाहेर काढणे कठीण होत आहे. खुद्द जो बायडन यांनी म्हटले आहे की, हे इतिहासातील सर्वात आव्हानात्मक एअरलिफ्ट आहे.

सैनिकांच्या उपस्थितीसाठी मुदत वाढवण्याबाबत चर्चा

सीआयएने तालिबानबरोबर झालेल्या बैठकीचा उल्लेख करण्यास नकार दिल्याचे अहवालात म्हटले आहे. परंतु अशी चर्चा आहे की, 31 ऑगस्टची मुदत वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून चर्चा झाली आहे, जेणेकरुन अमेरिका आपल्या नागरिकांना आणि अफगाण मित्रांना युद्धग्रस्त देशातून बाहेर काढू शकेल. बायडन प्रशासनावर 31 ऑगस्टनंतर अमेरिकन सैन्याची उपस्थिती कायम ठेवण्यासाठी त्यांच्या काही मित्रांच्या दबावाखाली आहे. दुसरीकडे जे लोक तालिबान आणि अफगाण सहयोगींच्या क्रूर राजवटीतून वाचले त्यांना देशातून हाकलून देण्यात येऊ शकते.

शांति समझौता करणारे: बरादार

तथापि, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन (Suhail Shaheen) यांनी सोमवारी सांगितले की, अमेरिका आणि ब्रिटनने 31 ऑगस्टनंतर युद्धग्रस्त देशात आपले सैन्य ठेवले तर त्याचे गंभीर परिणाम होतील असं म्हटलं होतं. अब्दुल गनी बरदार यांनी आठ वर्षे पाकिस्तानी तुरुंगात काढली आहेत. त्याला 2018 मध्ये सोडण्यात आले आणि तो अमेरिकेबरोबर कतारमधील शांतता करारातील प्रमुख व्यक्ती होता. या कराराअंतर्गत अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य बाहेर काढण्याबाबत बोलले होते. तालिबानचे संस्थापक सर्वोच्च नेते मोहम्मद उमर यांचे निकटवर्तीय असलेले बरदार हे तालिबान संघटनेतील अत्यंत प्रभावशाली व्यक्ती आहेत, असे या पोस्टने कळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

SCROLL FOR NEXT