तालिबान्यांनसारखं चीन आमच्यावरही कब्जा करु पाहतय: तैवान परराष्ट्र मंत्री

तैवान हा आपलाच भाग असल्याचा दावा चीनी सरकार (Chinese Government) बऱ्याच काळापासून करत आहे.
China President & Taiwan President
China President & Taiwan PresidentDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमधील अशरफ घनी (Ashraf Ghani) यांची राजकिय सत्ता उलथवून टाकल्यानंतर तालिबान्यांनी आता सत्ता स्थापनेस सुरुवात केली आहे. यातच आता तैवानचे (Taiwan) परराष्ट्र मंत्री जोसेफ वू (Foreign Minister Joseph Wu) यांनी चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, चीनला तालिबानप्रमाणे आपल्या देशावर कब्जा करायचा आहे. तैवान हा आपलाच भाग असल्याचा दावा चीनी सरकार (Chinese Government) बऱ्याच काळापासून करत आहे. त्याचबरोबर चीनने बराच काळापासून तैवानवर ताबा मिळवण्याचे मन बनवलेले आहे. अमेरिका समर्थित अफगाणिस्तान सरकार झटक्यात कोसळल्यानंतर चीनने तैवानवरही अशाच प्रकारे कब्जा करणार असल्याच्या हेतूची चर्चा सुरू झाली आहे. तैवान आता अमेरिकेवर विश्वास ठेवू शकत नाही हे सुचवण्यासाठी काबूलचे भाग्य पुरेसे आहे, असे चिनी मीडियाकडून सांगण्यात येत आहे.

China President & Taiwan President
अशरफ घनी यांना मोठा धक्का, भाऊ तालिबानमध्ये सामील

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने अलीकडेच चीनला तैवानवर दबाव आणणे बंद करण्यास सांगितले. अमेरिकेच्या या विधानावर तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी अमेरिकेचे आभार मानत म्हटले की, चीन ताईबानप्रमाणे तैवानला काबीज करण्याचे स्वप्न पाहत आहे. या संदर्भात मात्र चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अफगाणिस्तानात तालिबानला चीन सहकार्य करत असल्याची जगभरात चर्चा सुरु आहे. चीनला तालिबानकडून आश्वासन हवे आहे की, शिनजियांगमध्ये कार्यरत असलेल्या उईघुर मुस्लिम अतिरेकी गटांचा अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सहकार्य करु नये.

China President & Taiwan President
China ने तियानहुई उपग्रहाचे केले प्रक्षेपण, March-4B वाहक रॉकेट मालिकेचे 9 वे मिशन

आतापासून चीनमध्ये फक्त तीन मुलांच्या धोरणाला मान्यता दिली

चीनच्या राष्ट्रीय विधानसभेने शुक्रवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या तीन अपत्य धोरणाला औपचारिक मान्यता दिली. जेणेकरुन जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या चीनमधील मुलांच्या जन्मदरात किंचित घट होऊ शकेल. चीनमध्ये अनेक दशकांपासून एक मूल धोरण काटेकोरपणे पाळले जात होते. असे असूनही, येथील लोकसंख्या 1.41 अब्ज आहे. लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायद्यातील सुधारणेमुळे चिनी जोडप्यांना तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी मिळाली आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) च्या स्थायी समितीने हा कायदा सभागृहासमोर मंजूर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com