USA- CHINA Flag Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानला विनाशकारी बॅलेस्टिक मिसाइलसाठी उपकरणे पुरवणाऱ्या चीनी कंपन्यांना अमेरिकेचा झटका

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानमध्ये क्षेपणास्रांची मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या निर्मितीमुळे अमेरिकेने पाकिस्तान आणि क्षेपणास्रांच्या निर्मितीत मदत करणाऱ्या कंपन्यांबाबत मोठा पाऊल उचलले आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत त्यांच्या संबंधात तणाव दिसून येतो.

याबरोबरच चीन आणि अमेरिकेमध्येदेखील मतभेद आणि वाद दिसून येतात. आता पाकिस्तानबरोबर चीनच्या तीन कंपन्यांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी क्षेपणास्त्राशी संबंधित उपकरणे पुरवल्याबद्दल अमेरिकेने निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबाबत मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आज आम्ही तीन कंपन्यांवर कार्यकारी आदेश 13382 नुसार निर्बंध लादत आहोत ज्या मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रांच्या प्रसार आणि वितरणाशी संबंधित आहेत." या तिन्ही कंपन्या चीनच्या असून त्यांनी पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला क्षेपणास्त्राशी संबंधित भाग आणि उपकरणे पुरवली आहेत.

चीन हा पाकिस्तानचा गेल्या बऱ्याच काळापासून मित्र आहे आणि इस्लामाबादच्या लष्करी आधुनिकीकरण कार्यक्रमासाठी शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणांचा मुख्य पुरवठादार आहे. जनरल टेक्नॉलॉजी लिमिटेड, बीजिंग लुओ लुओ टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड आणि चांगझोउ युटेक कंपोझिट कंपनी लिमिटेड या तीन कंपन्या आहेत ज्यावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत.

यापूर्वी बायडेन सरकारने इराणवरदेखील निर्बंध लादले होते. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांवर हे निर्बंध होते. संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने हे पाऊल उचलले.

अमेरिकेने 11 लोक, 8 संस्था आणि एका जहाजावर निर्बंध लादले आहेत. ज्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत त्यांचे संबंध हाँगकाँग, व्हेनेझुएला आणि चीनशी आहेत. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांना या संस्था आणि लोक मदत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT