US President Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन एका कार्यक्रमादरम्यान पुन्हा अडखळून पडले. यावेळची घटना कोलोरॅडोमधील आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
तथापि, बायडन यांचा तोल जाण्याची ही पहिलीच घटना नाही. अमेरिकेत वयाबद्दल सुरु असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी 2024 मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.
दरम्यान, कोलोरॅडो येथील एअर फोर्स अकादमीच्या पदवीदान समारंभात बायडन स्टेजवर अडखळून पडले. प्रत्यक्षात व्यासपीठावर पोहोचलेल्या राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर आपल्या जागेवर परतत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि पडले. हे पाहून हवाई दलाचे अधिकारी तात्काळ धावून आले आणि त्यांनी त्यांना सावरले.
मात्र, बायडन यांच्यावर या घटनेचा फारसा परिणाम दिसून आला नाही. त्यांनी लगेच स्वतःला सावरले आणि सीटवर परतले. स्टेजवरील वाळूच्या पिशव्यांमुळे ही घटना घडल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
खरे तर, अशा दोन पिशव्या टेलीप्रॉम्प्टरला आधार देण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. व्हाईट हाऊसमध्ये परतल्यावर 80 वर्षीय बायडन देखील या घटनेची खिल्ली उडवताना दिसल्याचे बोलले जात आहे.
2023 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अशाच घटना घडल्या आहेत, जिथे बायडन अडखळून पडले. जून 2022 मध्ये, लॉस एंजेलिसच्या फ्लाइटमध्ये चढत असताना त्यांचा अचानक तोल गेला होता.
यापूर्वी मे 2022 मध्ये, अँड्र्यूज एअर फोर्स बेसवर विमानात (Airplanes) चढताना त्यांचा तोल गेला होता, परंतु हँडरेल्सच्या मदतीने त्यांनी स्वतःला सावरले होते.
2022 मध्ये अमेरिकेतील (America) डेलावेअर बीचवर बायडन यांच्या बाबतीत अशीच घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सायकल अचानक थांबवत असताना त्यांचा तोल गेला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.