US Iran War Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

US Destroys Own Aircraft in Iran Desert: अमेरिकन वैमानिक इराणच्या सीमेत अडकल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली होती.

Manish Jadhav

US Destroys Own Aircraft in Iran Desert: इराणच्या अंतर्गत भागात कोसळलेल्या आपल्या F-15E स्ट्राईक ईगल विमानातील वैमानिकांना वाचवण्यासाठी अमेरिकेने राबवलेली धाडसी बचाव मोहीम यशस्वी झाली असली, तरी यासाठी अमेरिकेला मोठी किंमत चुकवावी लागली. या मोहिमेदरम्यान तांत्रिक बिघाड आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अमेरिकेने आपली दोन अत्यंत प्रगत आणि महागडी विमाने स्वतःच बॉम्बने उडवून दिली. इराणच्या वाळवंटी भागात पार पडलेल्या या मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले असून जगभरात याची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन वैमानिक इराणच्या सीमेत अडकल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेसाठी अमेरिकेने स्पेशल ऑपरेशन्स ट्रान्सपोर्ट विमाने इराणच्या वाळवंटातील एका तात्पुरत्या एअरफील्डवर उतरवली. मात्र, लँडिंगदरम्यान ही विमाने वाळवंटातील वाळूत अडकली किंवा त्यात काही तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे ती पुन्हा उड्डाण करण्यास असमर्थ ठरली. इराणची सेना जवळ येत असल्याचे पाहून अमेरिकन सैनिकांसमोर मोठे संकट उभे राहिले. अशा परिस्थितीत आपल्या वैमानिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त विमाने मागवण्यात आली.

मात्र, मागे सोडून द्यावी लागलेली दोन ट्रान्सपोर्ट विमाने शत्रूच्या हाती लागू नयेत, यासाठी अमेरिकेने आपल्या प्रोटोकॉलनुसार ती स्वतःच बॉम्बने उडवून दिली. या विमानांमध्ये अत्यंत गोपनीय दळणवळण यंत्रणा, नेव्हिगेशन आणि विशेष ऑपरेशन्ससाठी लागणारे हाय-टेक तंत्रज्ञान बसवलेले असते. हे तंत्रज्ञान किंवा विमानाचे अवशेष इराणच्या हाती लागणे अमेरिकेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरले असते. ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये राबवलेल्या मोहिमेदरम्यानही अमेरिकेने आपले एक हेलिकॉप्टर अशाच प्रकारे नष्ट केले होते. आर्थिक नुकसानापेक्षा तंत्रज्ञानाची गुप्तता राखणे अमेरिकेसाठी अधिक महत्त्वाचे मानले जाते.

इराणच्या (Iran) सरकारी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये इस्फहान प्रांतातील वाळवंटात विमानाचे जळलेले अवशेष विखुरलेले दिसत आहेत. हे अवशेष 'लॉकहीड मार्टिन C-130' श्रेणीतील विमानांचे असल्याचे समजते, ज्याची किंमत 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या ढिगाऱ्यात 'बोइंग MH-6 लिटल बर्ड्स' या छोट्या हेलिकॉप्टरचे अवशेषही आढळले, जे सहसा विशेष मोहिमांसाठी वापरले जातात. दरम्यान, इराणच्या लष्करी कमांडने या घटनेवर टीका करताना म्हटले की, अमेरिकेने आपल्या विमानांवर बॉम्बफेक केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नामुष्कीपासून वाचवण्यासाठी केली. वैमानिक वाचले असले तरी, या मोहिमेमुळे अमेरिकेच्या लष्करी साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT