US Iran War Timeline Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War Timeline: सुप्रीम लीडरचा अंत, 4000 मृत्यू अन् 90 हजार घरांची राखरांगोळी! अमेरिका-इराण युद्धाच्या टाइमलाइनचा थरारक पट; 40 दिवसांनी रक्तरंजित संघर्षाला ब्रेक

US Iran War Timeline February to April 2026: गेल्या 40 दिवसांपासून जगाचा श्वास रोखून धरणाऱ्या अमेरिका-इराण यांच्यातील रक्तरंजित संघर्षाला अखेर 14 दिवसांच्या सीजफायरने तात्पुरता लगाम घातला.

Manish Jadhav

US Iran War Timeline February to April 2026: गेल्या 40 दिवसांपासून जगाचा श्वास रोखून धरणाऱ्या अमेरिका-इराण यांच्यातील रक्तरंजित संघर्षाला अखेर 14 दिवसांच्या सीजफायरने तात्पुरता लगाम घातला. 28 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या युद्धाने केवळ आधुनिक शस्त्रास्त्रांचा विनाशकारी चेहराच दाखवला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही महामंदीच्या गर्तेत ढकलले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या शेवटच्या इशाऱ्यानंतर अचानक झालेल्या या कराराने तुर्तास तरी अण्वस्त्रांच्या छायेतील महायुद्ध टाळले. या 40 दिवसांमध्ये घडलेल्या थरारक घडामोडींचा आढावा घेतला, तर युद्धाची दाहकता प्रकर्षाने जाणवते.

या संघर्षाची ठिणगी 28 फेब्रुवारी रोजी पडली, जेव्हा अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. संपूर्ण आखाती देश रणांगणात रुपांतरित झाले. युद्धाच्या सुरुवातीच्या काळातच इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी जगाची 'लाईफलाईन' समजली जाणारी 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' बंद करण्याचे आदेश दिल्याने खळबळ माजली. 12 मार्च रोजी इराकमध्ये अमेरिकन विमान कोसळून 6 सैनिक ठार झाले आणि अमेरिकेच्या एकूण मृतांचा आकडा 13 वर पोहोचला. याला प्रत्युत्तर म्हणून 13 मार्च रोजी अमेरिकेने इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या 'खार्ग' बेटावरील तेल केंद्रांवर भीषण बॉम्बहल्ला केला. इराणच्या 90 टक्के तेल निर्यातीचे केंद्र उद्ध्वस्त झाल्याने जागतिक बाजारपेठेत हाहाकार माजला.

युद्धाचे स्वरुप 17 मार्च रोजी अधिक गंभीर झाले, जेव्हा इस्रायली फौजांनी इराणचे दोन मुख्य कमांडर अली लारिजानी आणि गुलामरेजा सुलेमानी यांना कंठस्नान घातले. नेतृत्वहीन झालेल्या इराणने 18 मार्च रोजी कतारमधील गॅस केंद्रांना लक्ष्य केले, तर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने इराणचे 'साऊथ पार्स' गॅस फील्ड उद्ध्वस्त केले. 27 मार्च रोजी इराणने थेट सौदी अरेबियातील अमेरिकन 'प्रिन्स सुल्तान एअर बेस'वर अचूक हल्ला चढवून अमेरिकेच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला मोठे आव्हान दिले. या युद्धात 28 मार्च रोजी येमेनमधील हूती विद्रोही सामील झाल्याने संघर्षाची व्याप्ती वाढली. 3 एप्रिल रोजी इराणने अमेरिकेचे अत्याधुनिक 'एफ-15 ई' लढाऊ विमान पाडल्याने युद्ध अण्वस्त्रांच्या टप्प्यावर पोहोचले की काय, अशी भीती निर्माण झाली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून 7 एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा अंतिम इशारा दिला. जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतानाच 8 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा करुन सर्वांना धक्का दिला. इराणनेही (Iran) याला आपला राजनैतिक विजय मानत मान्य केले. आता हे दोन आठवडे कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करतात की ही केवळ एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. 10 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये होणारी बैठक या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT