Iran US War Ceasefire: युद्धविरामानंतर तेहरानच्या रस्त्यांवर जनसागर, विजयाचा जल्लोष साजरा! "आम्ही झुकणार नाही", म्हणत इराणी नागरिकांचं शक्तीप्रदर्शन VIDEO

Iran US Ceasefire Celebration Tehran: गेल्या दीड महिन्यांपासून जागतिक शांतता धोक्यात आणणाऱ्या इराण अमेरिका यांच्यातील रक्तरंजित संघर्षाला अखेर दोन आठवड्यांचा पूर्णविराम मिळाला.
US Iran Ceasefire Celebration Tehran
US Iran Ceasefire Celebration TehranDainik Gomantak
Published on
Updated on

Iran US Ceasefire Celebration Tehran: गेल्या दीड महिन्यांपासून जागतिक शांतता धोक्यात आणणाऱ्या इराण अमेरिका यांच्यातील रक्तरंजित संघर्षाला अखेर दोन आठवड्यांचा पूर्णविराम मिळाला. दोन्ही देशांदरम्यान 14 दिवसांच्या युद्धविरामाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. या निर्णयाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम जागतिक व्यापारावर होणार असून इराणने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा 'हॉर्मुज जलमार्ग' दोन आठवड्यांसाठी खुला करण्याचे मान्य केले. या ऐतिहासिक घडामोडीनंतर आता 10 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये उभय देशांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, ज्यामध्ये या युद्धविरामाचे रुपांतर कायमस्वरुपी शांततेत करण्यावर चर्चा केली जाईल.

या युद्धाची ठिणगी 28 फेब्रुवारी रोजी पडली होती, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर एक मोठा लष्करी हल्ला चढवला होता. या विनाशकारी हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि उच्चपदस्थ लष्करी अधिकारी मारले गेले होते. या घटनेने इराणमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी समजला जाणारा हॉर्मुज जलमार्ग बंद केला होता.

या एका निर्णयामुळे आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांमध्ये कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरवठा खंडित होऊन ऊर्जा संकट ओढवले होते. भारतासह अनेक देशांची मालवाहू जहाजे या अरुंद समुद्रधुनीमध्ये अडकून पडली होती, ज्याचा फटका जागतिक बाजारपेठेला बसत होता. आता हा मार्ग खुला झाल्याने अडकलेली जहाजे आपल्या मुक्कामाकडे रवाना होऊ शकतील.

US Iran Ceasefire Celebration Tehran
Iran US War Ceasefire: 40 दिवसांचा रक्तरंजित संघर्ष थांबला! इराण-अमेरिका यांच्यात युद्धविराम; पण 'त्या' 10 अटींवरुन जगात खळबळ

इराणमध्ये (Iran) या शस्त्रसंधीचे रुपांतर मोठ्या जल्लोषात झाले. तेहरानच्या रस्त्यांवर हजारो नागरिक राष्ट्रीय ध्वज घेऊन उतरले असून याला अमेरिकेच्या दादागिरीवर मिळवलेला नैतिक विजय मानले जात आहे. मात्र, दुसरीकडे इस्रायलमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. इराणकडून कधीही दगाफटका होऊ शकतो किंवा ही शस्त्रसंधी केवळ पुनर्गठनासाठी वापरली जाऊ शकते, या भीतीने इस्रायलने संपूर्ण देशात हाय-अलर्ट जारी केला. विशेषतः सीमावर्ती भागात लष्करी हालचाली वाढवण्यात आल्या आहेत.

US Iran Ceasefire Celebration Tehran
US Iran War: डेडलाईन संपण्यापूर्वीच अमेरिकेचा मोठा हल्ला! इराणी सैन्याचं अंडरग्राउंड हेडक्वार्टर उद्ध्वस्त; बंकर-बस्टर बॉम्बच्या वर्षावानं चुकला काळजाचा ठोका

शस्त्रसंधीमुळे जगाला दिलासा मिळाला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही वेळ अत्यंत कठीण ठरत आहे. युद्धाच्या निर्णयामुळे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक गोंधळामुळे अमेरिकन जनता ट्रम्प यांच्यावर कमालीची संतापलेली आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेर हजारो निदर्शकांनी ठिय्या मांडला असून "युद्ध गुन्हेगार ट्रम्प यांनी आताच राजीनामा द्यावा," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

US Iran Ceasefire Celebration Tehran
US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

निदर्शकांचे म्हणणे आहे की, निवडणुकांपर्यंत वाट पाहणे आता शक्य नाही; ट्रम्प यांनी केलेली क्रूरता आणि जागतिक स्तरावरील मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी त्यांना तात्काळ पदच्युत करणे गरजेचे आहे. अमेरिकेतील हा अंतर्गत असंतोष आता ट्रम्प यांच्या राजकीय भविष्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे. 10 एप्रिलची बैठक केवळ सीजफायरची औपचारिकता नसून, ती जागतिक राजकारणाची नवीन दिशा ठरवणारी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com