Iran missile attack on US military bases in Jordan and Bahrain after Trump warning Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Missile Attack: "बदला घ्याल तर उद्ध्वस्त करु!" ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा पलटवार, जॉर्डन-बहारीनमधील लष्करी तळांवर डागली क्षेपणास्त्रे

Iran Missile Attack US Bases Jordan Bahrain: सप्टेंबर महिना सुरु होताच मध्यपूर्वेत पुन्हा एकदा महायुद्धाचे ढग घनदाट झाले असून अमेरिका आणि इराण आमनेसामने आले आहेत.

Manish Jadhav

Iran Missile Attack US Bases Jordan Bahrain: सप्टेंबर महिना सुरु होताच मध्यपूर्वेत पुन्हा एकदा महायुद्धाचे ढग घनदाट झाले असून अमेरिका आणि इराण आमनेसामने आले आहेत. अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) च्या अनेक शहरांमधील तळांवर बॉम्बचा वर्षाव केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आक्रमक पवित्रा घेत जॉर्डन आणि बहारीनसारख्या अरब देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला (Iran) थेट इशारा देत बदला घेण्याचा प्रयत्न केल्यास याहून अधिक भीषण परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली, तर दुसरीकडे तेहरानने अमेरिकेला या कृत्याचा पश्चात्ताप करावा लागेल असा प्रतिइशारा दिला आहे.

इराणच्या IRGC ने दावा केला की, त्यांनी जॉर्डनच्या प्रिन्स हसन एअर बेसवर लांब पल्ल्याचे RQ-4 आणि MQ-9 ड्रोन असलेल्या हँगरला लक्ष्य करुन क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात हँगरला भीषण आग लागली आणि अनेक अमेरिकन सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे, तरीही अमेरिका आणि जॉर्डनने अद्याप जीवितहानीच्या अधिकृत आकडेवारीची पुष्टी केलेली नाही.

तत्पूर्वी, अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणच्या केश्म बेट, चाबहार बंदर आणि बंदर अब्बास यांसारख्या महत्त्वाच्या भागांवर बॉम्बहल्ला केला होता. सिरिक काउंटीमध्ये क्षेपणास्त्र थेट एका विवाह सोहळ्यावर पडल्याने लहान मुलासह चौघांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले.

या युद्धाची ठिणगी सोमवारी पडली, जेव्हा इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन सागरी टँकरवर हल्ला केला. यानंतर भडकलेल्या अमेरिकेने इराणच्या मिसाइल लाँचर्सवर थेट हवाई हल्ला चढवला. सध्या मध्यपूर्वेत 50000 हून अधिक अमेरिकी सैनिक तैनात करण्यात आले असून, परिस्थिती कधीही हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

SCROLL FOR NEXT