America
America  Dainik Gomantak
ग्लोबल

America Economy Crisis: अमेरिकेला 'दिवाळखोरी'चा धोका, 3 आठवड्यात संपणार रोकड; जगावर मंदीचं सावट

Manish Jadhav

America Run Out of Cash: जगाची आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिकेकडे पाहिले जाते. पण आजकाल जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थाही धोक्यात आहे.

अमेरिकेला डिफॉल्टर होण्याचा धोका सतावत आहे. यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सातत्याने या धोक्याचा सामना करण्यासाठी रणनिती आखत आहेत.

याच पाश्वभूमीवर, अध्यक्ष बायडन आणि रिपब्लिकन हाऊसचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 'कर्ज मर्यादा' वाढवण्याबाबत चर्चा झाली.

'डेट सीलिंग' चा अर्थ सोप्या भाषेत समजून घेतला, तर ती अमेरिकन काँग्रेसने ठरवलेली खर्च मर्यादा आहे. याद्वारे सरकार किती कर्ज घेऊ शकते हे ठरवले जाते. त्याचबरोबर, भविष्यातील खर्चासाठी कर्जाची कमाल मर्यादा लागू नाही.

कर्ज घेण्याची मर्यादा तात्काळ भरावी लागणारी देयके संदर्भित करते. सामान्यतः या खर्चांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन (Pension) यासारख्या खर्चाचा समावेश होतो. अमेरिकेची एकूण अर्थव्यवस्था 23 ट्रिलियन डॉलर्स आहे.

करारापर्यंत पोहोचण्याची आशा आहे

अध्यक्ष बायडन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर मॅकार्थी म्हणाले की, "मला विश्वास आहे की आम्ही एक करार करु शकतो." तथापि, अध्यक्ष बायडन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही करार होऊ शकला नाही.

मॅकार्थी पुढे म्हणाले की, 'आम्ही अद्याप कोणत्याही करारापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण ज्या मुद्द्यांवर आमचे मतभेद होते, त्या मुद्द्यांवर चर्चा यशस्वी झाली असे मला वाटते. एक करार होईपर्यंत बायडन आणि मी दररोज एकमेकांशी बोलू.'

बायडन यांनी एक निवेदन जारी केले की, 'मी नुकतीच स्पीकर मॅकार्थी यांच्याशी डीफॉल्ट रोखण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था (Economy) उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याच्या गरजेबद्दल बैठक घेतली होती. ही बैठक अतिशय फलदायी ठरली. या संदर्भात पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे द्विपक्षीय करारावर विश्वास ठेवणे.

अमेरिका डिफॉल्ट झाली तर?

अमेरिकेचे कर्ज संकट संपले नाही, तर येत्या तीन आठवड्यांत त्यांच्याकडील रोकड संपेल, असा अंदाज गोल्डमन सॅक्सने व्यक्त केला आहे.

बँकेचे म्हणणे आहे की, 8 किंवा 9 जूनपर्यंत ट्रेझरी विभागाकडे असलेली रोकड $30 अब्जपर्यंत घसरेल. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या गरजा भागवण्यासाठी ही रोकड खूपच कमी आहे.

दुसरीकडे, इंवेस्टमेंट बँकेचे अर्थशास्त्रज्ञ अॅलेक फिलिप्स आणि टिम क्रुपा यांनी चेतावणी दिली की, सध्याची परिस्थिती पाहता 1 किंवा 2 जूनपर्यंत रोकड संपुष्टात येऊ शकते. असे झाल्यास, अमेरिका डिफॉल्ट होईल. अमेरिकेचे डिफॉल्ट म्हणजे जागतिक मंदी येईल. त्याचा परिणाम जगातील अर्थव्यवस्थांवर होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT