Cluster Bombs Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: अमेरिका युक्रेनला देणार धोकादायक क्लस्टर बॉम्ब, 120 देशांनी घातलीय बंदी; जाणून घ्या

Russia Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला क्लस्टर बॉम्ब पुरवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा बचाव केला आहे.

Manish Jadhav

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असेलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला क्लस्टर बॉम्ब पुरवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा बचाव केला आहे.

बायडन म्हणाले की, 'हा खूप कठीण निर्णय होता, मात्र युक्रेनजवळील शस्त्रास्त्रांचा तुटवडा लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा लागला.' युक्रेनला क्लस्टर बॉम्ब पुरवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यास बराच वेळ लागला, मात्र युक्रेनकडे युद्धात दारुगोळा संपत असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.

या कारणास्तव हा अत्यंत कठीण निर्णय घेण्यात आला असून त्याआधी त्यांनी सहयोगी देशांशीही चर्चा केली आहे. ते पुढे म्हणाले की, पुढील आठवड्यात लिथुआनियामध्ये नाटोची शिखर परिषद होणार आहे.

दरम्यान, युक्रेनच्या नेत्यांनी हे वेळेवर उचललेले मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी योग्य वेळी लष्करी मदत दिल्याबद्दल अमेरिकेचे आभार मानले. दुसरीकडे, अमेरिकेच्या या निर्णयावर रशियाने टीका केली आहे.

नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायजर जेक सुलिव्हन यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, क्लस्टर शस्त्रास्त्रांमुळे स्फोट न झालेल्या बॉम्बपेक्षा नागरिकांच्या हानीचा मोठा धोका आहे. म्हणूनच आम्ही निर्णय जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत पुढे ढकलला होता, परंतु आता युक्रेनकडे शस्त्रे आणि तोफखाना संपत आहे."

अमेरिका (America) देशांतर्गत उत्पादन वाढवत असताना अशा स्थितीत त्याला पुरवठ्याच्या पुलाची गरज आहे. युक्रेनला युद्धाच्या काळात आम्ही कधीही असहाय्य सोडणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.

क्लटर बॉम्ब धोकादायक

अमेरिका युक्रेनला (Ukraine) पाठवणारी क्लस्टर युद्धसामग्री 155 मिमी हॉवित्झरमधून उडवली जाईल आणि प्रत्येक डब्यात 88 बॉम्ब असतील. सीएनएनच्या अहवालात म्हटले आहे की, प्रत्येक बॉम्बची प्राणघातक श्रेणी सुमारे 10 चौरस मीटर आहे.

अशा प्रकारे एक डबा 30 हजार चौरस मीटरपर्यंत क्षेत्र व्यापू शकतो. हे बॉम्ब भूसुरुंगांप्रमाणे स्फोट न होता बराच काळ पडून राहू शकतात. जेव्हा कोणी त्यांच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांचा स्फोट होऊ शकतो.

दुसरीकडे, वॉशिंग्टनमधील रशियन राजदूत अनातोली अँटोनोव्ह म्हणाले की, अमेरिकेमुळे अनेक वर्षे निष्पाप लोक स्फोटकांचे बळी बनण्याचा धोका आहे. क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्यासाठी 120 देशांनी करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती आहे. मात्र अमेरिका, रशिया आणि युक्रेनने त्यावर स्वाक्षरी केलेली नाही.

'ते कुठेही वापरु नये'

तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या वतीने मार्टा हुर्टॅडो म्हणाल्या की, अशा शस्त्रांचा वापर ताबडतोब थांबला पाहिजे आणि त्याचा कुठेही वापर करु नये. खार्किवमध्ये क्लस्टर युद्धसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे पाहिल्यानंतर मानवी हक्क गटांनी अमेरिकेच्या निर्णयावर टीका केली.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, संघर्ष संपल्यानंतरही क्लस्टर शस्त्रास्त्रांमुळे दिर्घकाळ धोका उद्भवू शकतो. क्लस्टर युद्धसामग्री पाठवण्याच्या निर्णयावर अमेरिकन खासदारांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. काही डेमोक्रॅट्सनी या निर्णयाला धोकादायक आणि भयंकर चूक म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT