Russia-Ukraine War: युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला, जगभरात किरणोत्सर्गाचा 'धोका'

Russia-Ukraine War: रशियाने आग्नेय युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणुऊर्जा केंद्रावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.
 Zaporizhzhia Nuclear Plant
Zaporizhzhia Nuclear PlantDainik Gomantak
Published on
Updated on

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. यातच आता, रशियाने आग्नेय युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणुऊर्जा केंद्रावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. यामुळे बाह्य वीजपुरवठा खंडित झाला आहे.

तर दुसरीकडे, रशियन अधिकारी व्लादिमीर रोगोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनने त्यांच्याकडून नियंत्रित वीजवाहिनी खंडित केल्यानंतर प्लांटचा बाह्य वीजपुरवठा "पूर्णपणे" खंडित करण्यात आला होता.

'द मॉस्को टाईम्स' मधील रिपोर्टनुसार, रशियन प्रशासनाने टेलिग्रामवर लिहिले आहे की, "हाई-टेंशन लाइन कट झाल्याने, अणुऊर्जा प्रकल्पाचा बाह्य वीजपुरवठा खंडित झाला. आउटेजचे कारण तपासले जात आहे.'' त्याचबरोबर, आण्विक सुविधेतील डिझेल जनरेटरची बॅकअप उर्जा पुनर्संचयित केली जात आहे, असे अहवालात म्हटले आहे.

 Zaporizhzhia Nuclear Plant
Russia-Ukraine War: अटक वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशाला पुतीन यांचा दणका, वॉन्टेड लिस्टमध्ये...!

फक्त 10 दिवसांसाठी पर्यायी व्यवस्था:

युक्रेनची (Ukraine) आण्विक एजन्सी एनरगोएटमने सोमवारी सकाळी रशियावर हल्ला केल्याचा आरोप केला. एजन्सीने सांगितले की, रशियन हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पातील वीज खंडित झाली.

मार्च 2022 मध्ये प्लांट रशियन सैन्याच्या नियंत्रणाखाली आल्यापासून "ब्लॅकआउट मोड" मध्ये जाण्याची ही सातवी घटना आहे, असा एजन्सीचा आरोप आहे. तथापि, Energoatom ने सांगितले की, त्यांच्याकडे जनरेटरसाठी 10 दिवस पुरेसा इंधन साठा आहे.

किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला:

दुसरीकडे, त्याच एजन्सीने इशारा दिला आहे की, जर या प्लांटमध्ये 10 दिवसांत बाह्य शक्ती पुनर्संचयित केली गेली नाही तर संपूर्ण जग रेडिएशनखाली येऊ शकते आणि त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.

तसेच, डनिप्रो प्रदेशाच्या गव्हर्नरने सांगितले की, रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात चार रशियन क्षेपणास्त्रे आणि 15 ड्रोन पाडले गेले, ज्यामध्ये आठ नागरिक (Citizens) जखमी झाले.

 Zaporizhzhia Nuclear Plant
Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर टाकला 'फॉस्फरस बॉम्ब', जाणून घ्या किती धोकादायक...

संयुक्त राष्ट्राला हस्तक्षेप करावा लागला:

संयुक्त राष्ट्रांचे अणु प्रमुख राफेल ग्रोसी, ज्यांनी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी रशिया आणि युक्रेनबरोबर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान त्यांनी सांगितले की, 'युद्धादरम्यान अणुऊर्जा प्रकल्पातील वीज खंडित झाली. ही सातवी घटना आहे. प्लांटमधील आण्विक सुरक्षेची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. आता आपण कोणत्याही परिस्थिती त्याचे संरक्षण केले पाहिजे. त्याचबरोबर, अशी परिस्थिती या पुढे निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.'

झापोरिझ्झ्या न्यूक्लियर पॉवर स्टेशन किती महत्वाचे आहे:

झापोरिझ्झ्या न्यूक्लियर पॉवर स्टेशन हा युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. याची गणना जगातील 10 सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात होते. या प्रकल्पातून युक्रेनला सुमारे 20% वीज पुरवठा केला जातो.

आक्रमणादरम्यान, सीमावर्ती प्रदेश एनेर्होदरच्या लढाईत 4 मार्च 2022 रोजी रशियन सैन्याने आण्विक आणि थर्मल पॉवर स्टेशन ताब्यात घेतले होते.

न्यूक्लियर प्लांटची वैशिष्ट्ये:

अणुऊर्जा केंद्र नीपर नदीच्या काठावर स्थित आहे, विवादित डोनबास प्रदेशापासून केवळ 200 किमी अंतरावर जिथे रशिया समर्थित फुटीरतावादी आणि युक्रेनियन सैन्य युद्धात आहेत.

झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांट युक्रेनमध्ये असलेल्या चार कार्यरत NPPs पैकी एक आहे. तो 1984 पासून कार्यरत आहे. या प्लांटमध्ये 1984 आणि 1995 दरम्यान चालू केलेल्या सहा दाबयुक्त पाण्याच्या अणुभट्टी युनिट्सचा समावेश आहे, प्रत्येकाची एकूण विद्युत क्षमता 1,000 मेगावॅट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com