China America War | Mike Minihan Dainik Gomantak
ग्लोबल

China America War: 'या' वर्षी होणार अमेरिका-चीन युद्ध... यूएसएच्या हवाईदल प्रमुखांनी व्यक्त केली भीती

तैवान-चीन तणाव ठरणार युद्धाचे कारण

Akshay Nirmale

China America War: जगातील एकमेव महासत्ता अमेरिका आणि अमेरिकेला या पदावरून हटवून तिथे महासत्ता म्हणून बसण्याचा प्रयत्न करत असलेला चीन यांच्यात सतत कुरबुरी होत असतात.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना चीनसोबतचे अमेरिकेचे ट्रेड वॉर गाजले होते. तथापि, आता हे दोन्ही बलाढ्य देश प्रत्यक्ष युद्धात समोरासमोर येण्याची शक्यता अमेरिकेच्याच हवाईदलप्रमुखांनी वर्तवली आहे.

अमेरिकेचे फोर-स्टार वायुसेनेचे जनरल माईक मिनिहान यांनी पुढील 2 वर्षांत अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या विभागाला लिहिलेल्या मेमोमध्ये हा अंदाज वर्तवला आहे.

मिनिहान यांच्या पत्रातून अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेंटॅगॉनचे विचार प्रतिबिंबित होत नसले तरी, तैवानशी सुरू असलेला चीनचा संघर्ष या युद्धाचे कारण ठरू शकतो. तैवानला चीनमध्ये पुर्णतः सामावून घेण्याचा प्रयत्न चीन गेल्या काही काळापासून करत आहे. तर अमेरिकेनेही नेहमीच तैवानच्या बाजूने भूमिका घेतली आहे.

मिनिहान म्हणाले- मला वाटते की आम्ही 2025 मध्ये चीनसोबत युद्ध करू. ही भीती चुकीची सिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांत 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतील.

त्यामुळे चीनकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, मिनिहान यांच्या अंदाजाबाबत बोलताना, अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, ही टिप्पणी अमेरिकेची चीनबद्दलची विचारसरणी किंवा दृष्टिकोन दर्शवत नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे.

तैवान सामुद्रधुनीवर चीनच्या लष्करी हालचाली वाढत आहेत. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, तैवान सामुद्रधुनीवर चीनच्या वाढत्या लष्करी कारवाया त्यांचे हेतू स्पष्टपणे दर्शवतात.

यासोबतच चीनने गेल्या काही वर्षांत तैवानवर राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबावही वाढवला आहे. तैवान सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांना शांतता हवी आहे, पण हल्ला झाल्यास ते स्वतःचे रक्षण नक्कीच करतील.

तैवानने लष्करात महिलांचा समावेश करणार

चीनची घुसखोरी आणि युद्धाची तयारी लक्षात घेऊन तैवानने आपली तयारी वाढवली आहे. यासाठी तैवान महिलांचा राखीव दलात समावेश करून त्यांना पुरुषांप्रमाणे लष्करी प्रशिक्षण देणार आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की ते या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून 220 महिला सैनिकांना प्रशिक्षण देणार आहेत.

अमेरिकनच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी गेल्या वर्षी तैवान दौऱ्यावर गेल्या होत्या. तेव्हा चीनचा खूप जळफळाट झाला होता. त्यानंतर चीनने तैवानच्या हद्दीत 71 लढाऊ विमानांसह सागरी आणि हवाई कवायती केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT