Pakistan Bus Accident: बलुचिस्तानमध्ये बस दरीत कोसळून 40 प्रवासी ठार

यु-टर्न घेत असताना पुलाच्या पिलरला धडकली बस
Pakistan Bus Accident
Pakistan Bus AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Bus Accident: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बलुचिस्तानमध्ये रविवारी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. या अपघातात 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचावकार्यासाठी पोलिस आणि मदत कर्मचार्‍यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Pakistan Bus Accident
Pakistan Currency: पाकिस्तान आणखी गाळात; डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण

बलुचिस्तानमधील लासबेला भागात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खड्ड्यात पडलेल्या बसमध्ये सुमारे 48 प्रवासी होते. बस क्वेटाहून कराचीला जात होती. लासबेला जिल्ह्यातील बेला भागात एका ठिकाणी यू-टर्न घेत असताना बस पुलाच्या पिलरला धडकली, असे सांगण्यात येत आहे.

पुलाच्या पिलरला धडकल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात पडली. खड्ड्यात पडलेल्या बसलाही आग लागली. लासबेला येथील सहाय्यक आयुक्त हमजा अंजुम यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. बचाव कार्याचीही त्यांनी माहिती दिली आहे.

Pakistan Bus Accident
Israel-Palestine Conflict: आतंकवादाला पाठिंबा देणाऱ्यांची घरे होणार जमीनदोस्त

हमजा अंजुम यांनी सांगितले की, बसमधील एक बालक आणि एका महिलेसह तीन जणांना वाचवण्यात आले आहे. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील नेमके किती प्रवासी होते, याची माहिती मिळालेली नाही.

बस खोल दरीत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. घटना घडली शेजारून ये-जा करणाऱ्यांसह आसपासच्या नागरिकांचीही घटनास्थळी गर्दी होती. लोकांनी अपघाताची माहिती पोलीस आणि इतर संबंधित विभागांना दिली. बसमधून आतापर्यंत 19 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com