BBC Documentary On Modi  Dainik Gomantak
ग्लोबल

BBC Documentary On Modi: बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत अमेरिकेने बदलली भूमिका; आधी भारताचे केले होते कौतूक...

'इंडिया: द मोदी क्वश्चन' डॉक्युमेंटरीवरून भारतातील विद्यापीठांमध्ये तणाव

Akshay Nirmale

BBC Documentary On Modi: भारतात सुरू असलेल्या बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादात आता अमेरिकेने 48 तासांत आपली भूमिका बदलली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा हवाला देत बीबीसीच्या माहितीपटाची बाजू घेण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी माहितीपटावर बंदी घालणे ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, संपूर्ण जगभरात भाषण स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची वेळ आली आहे आणि भारतातही तेच लागू होते.

दरम्यान, याआधी मंगळवारी डॉक्युमेंटरी वादाच्या प्रश्नावर प्राइस म्हणाले होते की, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची सामायिक मूल्ये समृद्ध लोकशाही बनवतात. तर त्यानंतर बुधवारच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये प्राइस म्हणाले की, वॉशिंग्टन जगभरातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एखाद्याच्या धार्मिक विश्वासाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे बळकटीकरण यासह लोकशाही तत्त्वे आम्ही सातत्याने अधोरेखित करतो. तेच आमच्या लोकशाहीला आधार देतात. याच एकमेव मुद्याद्वारे आपण जगभरात आपले संबंध निर्माण करतो आणि याच मुद्द्यावरून भारतासोबतचे आपले नातेही दृढ होते.

या डॉक्युमेंटरीचा पहिला भाग 17 जानेवारी रोजी प्रसारित झाला होता. दुसरा एपिसोड 24 जानेवारीला रिलीज होणार होता. याआधीही केंद्र सरकारने पहिला एपिसोड यूट्यूबवरून काढून टाकला होता.

भारत सरकारने या डॉक्युमेंटरीला पंतप्रधान मोदी आणि देशाविरुद्धचा अपप्रचार असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, माहितीपटामागील अजेंडा काय आहे हे आम्हाला माहीत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हा अपप्रचार आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री 9 वाजता डॉक्युमेंटरी दाखवण्याची योजना आखली. डॉक्युमेंट्री दाखवली जात असताना विद्यार्थ्यांवर अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी दगडफेक केली. तत्पूर्वी येथील विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाची वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते.

बुधवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही ही डॉक्युमेंटरी दाखवण्याची योजना होती. त्यामुळे पोलिसांनी ७ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. तर बुधवारीच हा माहितीपट दाखवण्यावरून पंजाब विद्यापीठात (पीयू) गदारोळ झाला.

माहितीपट पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी जमले होते. विद्यापीठ प्राधिकरणाला ही बाब कळताच त्यांनी माहितीपट तातडीने बंद केला. याआधी जवळपास अर्धा माहितीपट निघून गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

MS Dhoni Viral Video: सिगारेटचं पाकीट धोनीचं की साक्षीचं? सलमानच्या पार्टीदरम्यानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी 'माही'ला धरलं धारेवर

पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेऊनच परतणार; अग्निकांड आणि ZP निवडणुकीनंतर CM सावंतांनी गाठली दिल्ली

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT