Cyclone Dainik Gomantak
ग्लोबल

Bomb Cyclone: बॉम्ब वादळामुळे अमेरिकन नागरिकांचा ख्रिसमस होणार खराब

Bomb Cyclone: या वादळामुळे ख्रिसमसच्या सु्ट्टीत लोकांचे फिरायला जाण्याचे प्लॅन त्यांना रद्द करावे लागणार आहेत

दैनिक गोमन्तक

Bomb Cyclone: आर्टिकवरुन येणाऱ्या थंड हवेमुळे अमेरिकेतील जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. तज्ञांच्यामते, अमेरिकेत बॉम्ब तूफान निर्माण होत असून ते विनाशकारी आहे. या वादळामुळे ख्रिसमसच्या सु्ट्टीत लोकांचे फिरायला जाण्याचे प्लॅन त्यांना रद्द करावे लागणार आहेत.

अमेरिकेत काही ठिकाणी ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कमी झाले आहे. ख्रिसमसपर्यत हे तापमान अजून कमी होण्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे काही ठिकाणी विमाने रद्द करण्यात आली आहेत तसेच रस्तेही बंद करण्यात आले आहेत. या तूफानाचा प्रभाव कॅनाडा (Canada )च्या सीमेपासून मेक्सिकोच्या सीमेपर्यत दिसून येत आहे. तज्ञांच्या मते, हे विनाशकारी वादळ असून जीवीतहानी होण्याची शक्यताही आहे.

दरम्यान, अमेरिके( USA ) चे राष्ट्रपती जो बायडन यांनी रहिवास्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वादळामुळे विमानसेवा तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत आणि होम शेल्टर पूर्ण भरले असल्याने अनेकांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेत सुट्टीच्या काळात बर्फ पडण्याचे रेकॉर्ड निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT