U.S. aircraft crashed on a north Australian island Sunday during a multination military exercise. Dainik Gomantak
ग्लोबल

US Marine: ऑस्ट्रेलिया-अमेरिका युद्धसरावात लढाऊ विमान क्रॅश; यूएस मरीनचे २३ जवान जखमी...

Australia: या युद्ध सरावात सहभागी झालेल्या 2,500 सैनिकांपैकी 500 अमेरिकन मरीन आहेत. ऑस्ट्रेलियन जवानांप्रमाणे फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि पूर्व तिमोरचे सैनिकही यात सामील आहेत.

Ashutosh Masgaunde

U.S. aircraft crashed on a north Australian island Sunday during a multination military exercise:

ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरीमध्ये युद्धसराव करताना रविवारी मध्यरात्री अमेरिकेच्या लष्करी जवानांचा समावेश असलेली विमानाला अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे.

या अपघातामध्ये यूएस मरीनचे 23 जवान जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये आतापर्यंत मृत्यूचे कोणतेही वृत्त नाही.

स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाने वृत्त दिले आहे की सुमारे 23 यूएस मरीन असलेले व्ही-22 ऑस्प्रे हेलिकॉप्टर डार्विनच्या किनाऱ्यावर कोसळले आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) ने सांगितले की, डार्विनच्या उत्तरेकडील तिवी बेटांवर विमान अपघातातून सर्व 23 लष्करी कर्मचार्‍यांची सुटका करण्यात आली आहे आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अधिकाऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणाहून अनेक जवानांची सुटका केली आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत युनायटेड स्टेट्स मरीनचे जवान आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाचे सदस्य सामील नव्हते.”

या अपघातातील जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून इतरांची प्रकृती स्थिर आहे, असे बचाव पथक केअरफ्लाइटने सांगितले.

प्रिडेटर्स रनचा सराव सुरू असताना हा अपघात झाला

ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या प्रिडेटर्स रन या युद्ध सरावा दरम्यान हा अपघात झाला. या युद्ध सरावात सहभागी झालेल्या 2,500 सैनिकांपैकी 500 अमेरिकन मरीन आहेत. ऑस्ट्रेलियन जवानांप्रमाणे फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि पूर्व तिमोरचे सैनिकही यात सामील आहेत. अपघातानंतर प्रीडेटर्स रनचा सराव थांबवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT