WATCH: 'भारत चंद्रावर पोहोचला अन् आम्ही...' पाकिस्तानच्या टिव्ही अँकरचा व्हिडीओ व्हायरल

जगाच्या अंतराळ इतिहासात भारताने आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले. भारताच्या यशस्वी चांद्रयान-3 मोहीमेचे जगभरातून कौतुक होत आहे.
Huma Amir Shah & Abdullah Sultan
Huma Amir Shah & Abdullah SultanDainik Gomantak
Published on
Updated on

जगाच्या अंतराळ इतिहासात भारताने आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले. भारताच्या यशस्वी चांद्रयान-3 मोहीमेचे जगभरातून कौतुक होत आहे. यामध्ये भारताचा कट्टर शत्रू मानला जाणारा पाकिस्तानही मागे नाही.

पाकिस्तानी नागरिकांनीही चांद्रयान-3 मोहीमेचे कौतुक केले. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चांद्रयान-3 मोहीमेचे पाकिस्तानी न्यूज अॅंकर कौतुक करताना दिसत आहे.

चंद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची बातमी देणारा आणि चंद्रावर पोहोचणारा एकमेव देश बनण्याच्या भारताच्या यशस्वी प्रयत्नांची प्रशंसा करणारा पाकिस्तानी न्यूज मीडिया चॅनेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारताच्या या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचे तोंड भरुन कौतुक करण्यात आले आहे.

भारताचे कौतुक

'भारताने (India) अतंराळ क्षेत्रात अविश्वसनीय कामगिरी केली. आम्ही भारताच्या या कामगिरीबद्दल खूश आहोत,' असे न्यूज अँकर हुमा अमीर व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.

"भारत आज चंद्रावर पोहोचला, परंतु आम्ही अजूनही मूलभूत समस्यांचाचं सामना करत आहोत. आम्हाला आता खरोखर व्यापक धोरण आखण्याची गरज आहे," पाकिस्तानमधील संकटाच्या परिस्थितीवर विचार करुन अमीर यांनी ही टिप्पणी केली. न्यूज अँकर हुमा आणि अब्दुल्ला यांनी विक्रम रोव्हरच्या सॉफ्ट लँडिंगचे कौतुक केले.

Huma Amir Shah & Abdullah Sultan
Pakistan Bus Caught Fire: धावत्या बसने घेतला पेट, 30 प्रवासी होरपळले; पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील घटना

त्यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की, 'भारताने चंद्रावर पोहोचून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे, तर पाकिस्तान हा असा देश आहे, जो फक्त मुलांचे नाव "चांद" असे ठेवतो.' शेवटी बातमीच्या वृत्ताचा समारोप करताना हुमाने भारताच्या चंद्र मोहिमेला "एकदम अद्भुत" असे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com