B-52 Bomber Crash Dainik Gomantak
ग्लोबल

B-52 Bomber Crash: टेकऑफ झाले अन् काही सेकंदातच होत्याचे नव्हते झाले! अमेरिकेचे महाकाय 'B-52 बॉम्बर' विमान कोसळले, 8 जणांचा जागीच मृत्यू

US Air Force B52 Bomber Crash: अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा कणा मानले जाणारे 'बी-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस' हे महाकाय बॉम्बर विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका भीषण अपघाताचे बळी ठरले.

Manish Jadhav

US Air Force B52 Bomber Crash: अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा कणा मानले जाणारे 'बी-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस' हे महाकाय बॉम्बर विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका भीषण अपघाताचे बळी ठरले. दक्षिण कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटात असलेल्या एडवर्ड्स हवाई दलाच्या तळातून या विमानाने टेकऑफ केले होते, परंतु हवेत झेपावताच ते दुर्घटनाग्रस्त झाले.

एपीने हवाई दलाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या अत्यंत शक्तिशाली लष्करी विमानात एकूण आठ लोक होते आणि या दुर्घटनेत त्या आठही जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन लष्कराने 'एक्स'वर माहिती दिली की, सकाळी 11 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाजात या अपघातातून कोणाचेही जिवंत वाचणे शक्य नव्हते असे स्पष्ट केले.

अपघातानंतर हवाई दलाच्या तळावरील धावपट्टीजवळ वाळवंटी भागात भीषण आग लागली आणि आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसले. विमानाचा ढिगारा पूर्णपणे नष्ट झाला असून लष्कराने हे विमान हत्यारांनी सज्ज होते की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, मदत आणि बचाव कार्याला प्राधान्य देण्यासाठी या एअरबेसवर बाहेरील नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. एडवर्ड्स एअर फोर्स बेस हा लॉस एंजेलिसपासून सुमारे 161 किलोमीटर उत्तरेला असून तो अमेरिकन हवाई दलाच्या विमान चाचणी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र विकास कार्यक्रमांचे मुख्य केंद्र मानला जातो. याच ऐतिहासिक लष्करी तळावर 1947 मध्ये चाचणी वैमानिक चक येगर यांनी आवाजाच्या गतीचा टप्पा पार करुन इतिहास रचला होता.

विमान वाहतूक सुरक्षा तज्ज्ञ जेफ गुजेटी यांच्या मते, विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच आणि जास्त उंची गाठण्यापूर्वीच कोसळणे हे 'फ्लाइट कंट्रोल सिस्टीम'मधील मोठ्या बिघाडाकडे संकेत करते. कदाचित विमानाचे मेंटेनन्स करताना नियंत्रण प्रणालीत काही त्रुटी राहिली असण्याची, इंजिनमध्ये गंभीर बिघाड झाल्याची किंवा चाचणी केल्या जाणाऱ्या एखाद्या उपकरणाच्या अपयशाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे, मात्र अंतिम तपास अहवालापूर्वी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे घाईचे ठरेल असेही त्यांनी म्हटले. यापूर्वी मागील वर्षी जुलै 2025 मध्ये नॉर्थ डकोटाच्या आकाशात एका प्रवासी विमानासमोर हेच बी-52 बॉम्बर विमान आले होते, तेव्हा वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान वळवल्यामुळे मोठा अपघात टळला होता.

अपघाताचा (Accident) बळी ठरलेले बी-52 बॉम्बर विमान जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रदीर्घ काळ सेवेत असलेल्या सामरिक विमानांपैकी एक आहे. शीतयुद्धाच्या काळात विकसित केलेल्या या विमानाची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे त्याची अवाढव्य शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आणि विनाथांबा लांब अंतराचा प्रवास करण्याची ताकद आहे. हे विमान अण्वस्त्रांसह पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारची हत्यारे वाहून नेण्यात सक्षम आहे. अत्याधुनिक रडार, नेविगेशन प्रणाली आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता यामुळे कोणत्याही हवामानात हे विमान आपले मिशन यशस्वी करु शकते. आपल्या बहुउद्देशीय उपयोगामुळे हे विमान आजही जागतिक लष्करी शक्तीचे आणि अमेरिकेच्या हवाई मोहिमांचे प्रमुख प्रतीक मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT