Companies Dainik Gomantak
ग्लोबल

Four Day Working Week: यूकेतील 100 कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा केला लागू!

दैनिक गोमन्तक

100 Companies In UK Switch To Four-Day Working Week: युनायटेड किंगडमची अर्थव्यवस्था रुळावरुन पुरती घसरली आहे. ऋषी सुनक सरकारही ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संकटाच्या काळात युनायटेड किंगडममधील शंभर कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांनी पगार कपात न करता सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चार दिवस कायमस्वरुपी काम करण्याचा नियम बनवला आहे. या 100 कंपन्यांमध्ये सुमारे 2,600 कर्मचारी काम करतात. आठवड्यातून 4 दिवस काम करुन ते देशात कायापालट घडवून आणू शकतील, असा त्यांचा विश्वास आहे.

या 100 मध्ये 2 मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे

चार दिवसांच्या कामकाजाच्या संकल्पनेच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, हे चार दिवसीय कामकाजाचे सूत्र कंपन्यांना त्यांची उत्पादकता सुधारण्यास आणि तेच काम कमी तासांत करण्यास प्रोत्साहित करेल. याशिवाय त्यांनी या धोरणाचे वर्णन कर्मचार्‍यांना (Employees) आकर्षित करण्याचा आणि त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचा एक उत्तम मार्ग असल्याचेही सांगितले आहे.

दरम्यान, या 100 कंपन्यांपैकी Atom Bank आणि Avin. या दोन्ही कंपन्यांचे यूकेमध्ये सुमारे 450 कर्मचारी आहेत. द गार्डियनशी बोलताना, एविनचे ​​मुख्य कार्यकारी अ‍ॅडम रॉस म्हणाले की, “नवीन कार्यपद्धतीवर स्विच करणे हा इतिहासात आपण पाहिलेल्या सर्वात परिवर्तनात्मक उपक्रमांपैकी एक आहे. यामुळे ग्राहक सेवा सुधारण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकतो.''

आणखी 70 कंपन्या ट्रायल करत आहेत

या 100 कंपन्यांशिवाय जगातील 70 कंपन्या 4 दिवस काम करत आहेत. या कंपन्यांमध्ये सुमारे 3,300 लोक काम करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT