Handwashing Dainik Gomantak
ग्लोबल

जागतिक स्तरावरील दहा पैकी तीन लोक हात धुण्याची सुविधेपासून वंचित: युनिसेफ

मात्र दुसरीकडे जागतिक स्तरावरील दहा पैकी तीन लोकांच्या घरी हात धुण्याची मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे युनिसेफने (UNICEF) म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) वाढू लागल्यानंतर लोकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे जागतिक स्तरावरील दहा पैकी तीन लोकांच्या घरी हात धुण्याची मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे युनिसेफने (UNICEF) म्हटले आहे. जागतिक स्तरावर 2.3 अब्ज लोकांकडे हात धुण्यासाठी पाणी आणि साबण नाही. विशेष म्हणजे विकसित देशांमध्ये परिस्थिती अधिकच वाईट आहे, जिथे दहा पैकी सहा लोक या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेकडून ग्लोबल हैंडवाशिंग डे (Global Handwashing Day) च्या पाश्वभूमीवर सांगण्यात आले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, जगभरातील पाचपैकी दोन शाळांमध्ये मूलभूत स्वच्छतेच्या सेवा उपलब्ध नाहीत, ज्यामुळे 818 मिलियन विद्यार्थी यापासून प्रभावित होतात, त्यापैकी 462 मिलियन विद्यार्थी कोणत्याही सुविधांशिवाय शाळांमध्ये जातात. देशातील 10 पैकी 7 शाळांमध्ये मुलांसाठी हात धुण्याची सुविधा उपलब्ध नाही. तथापि, नवीनतम आकडेवारी दर्शवते की, 2015 पासून काही प्रगती झाली आहे.

जागतिक लोकसंख्या 5 अब्ज वरुन 5.5 अब्ज झाली असून केवळ 67 ते 71 टक्के लोक दैनंदिन स्वच्छता सेवेचा वापर करत आहेत. तथापि, जर सध्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर 1.9 अब्ज लोकांना दशकाच्या अखेरीस मूलभूत सुविधा मिळणार नाही. 2030 पर्यंत, जगातील सर्वात कमी विकसित देशांपैकी 46 देशांतील सर्व घरांना हात स्वच्छ करण्याची सुविधा पुरवण्याचा खर्च अंदाजे 11 अब्ज डॉलर आहे. युनिसेफ वॉशचे संचालक केली एन नायलर (Kelly N. Naylor) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात जागतिक स्तरावर स्वच्छतेविषयी जागरुकता वाढवण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र अनेक देशांमध्ये अजूनही स्वच्छतेच्या संबंधीची परिस्थिती खालावलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT