Pakistan Poverty Report Dainik Gomantak
ग्लोबल

UNDP Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

UNDP Pakistan Multidimensional Poverty Report: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने पाकड्यांची पुन्हा एकदा पोलखोल केली.

Manish Jadhav

UNDP Pakistan Multidimensional Poverty Report: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने पाकड्यांची पुन्हा एकदा पोलखोल केली. पाकिस्तानातील वाढत्या गरिबीबाबत एक अत्यंत धक्कादायक अहवाल जाहीर केला. या अहवालातून पाकिस्तानातील गरिबीचे भयानक वास्तव समोर आले. या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे तब्बल 38.3 टक्के लोक गरिबीचा सामना करत आहेत. याचा साधा अर्थ असा की, या लोकांना केवळ पैशांचीच कमतरता नाही, तर राहण्यासाठी चांगल्या सुविधा, उत्तम आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींपासूनही वंचित राहावे लागत आहे. पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिले.

दरम्यान, पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशची तुलना केल्यास, बांगलादेशमध्ये बहुआयामी गरिबीचे प्रमाण 14.9 टक्के इतके आहे. म्हणजेच या दोन्ही देशांच्या गरिबीच्या आकडेवारीत खूप मोठा फरक असल्याचे दिसून येते. पाकिस्तानात गरिबीच्या खाईत लोटलेल्या लोकांच्या अडचणींचा स्तर 51.7 टक्के इतका गंभीर आहे. तसेच, पाकिस्तानची 12.9 टक्के लोकसंख्या अशी आहे जी अतिशय असुरक्षित स्थितीत जीवन जगत आहे. म्हणजेच ही लोकसंख्या कधीही गरिबीच्या तीव्र संकटात अडकू शकते.

गरीबी ही केवळ कमी कमाईवरुन मोजली जात नाही, तर त्यात कुपोषण, मुलांचा मृत्यूदर, शिक्षणाचा अभाव, स्वच्छतेची वाईट व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी नसणे आणि विजेची कमतरता यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षांत जगात पहिल्यांदाच बहुआयामी गरिबीने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढून 1.2 अब्जावर पोहोचली.

या गरिबीचा सर्वात मोठा फटका लहान मुलांना बसला असून, जगभरातील गरिबीचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लहान मुले आहेत. यातील 83 टक्के गरीब लोक हे ग्रामीण भागात राहतात, जिथे मूलभूत सुविधा मिळणे अजूनही खूप मोठे आव्हान बनले आहे. दक्षिण आशियातील देशामध्येही गरिबीचे संकट खूप मोठे असून लाखो मुले अद्याप शाळेच्या बाहेर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

Under 23 Cricket: गोव्याच्या हातात आलेला सामना निसटला? 75 वर 4 बाद असताना हिमाचलची त्रिशतकी मजल!

Ranji Trophy: बिहारवर फॉलोऑनची नामुष्की; गोव्याची 290 धावांची आघाडी, पहिल्या विजयाची चाहूल

IND vs NZ 1st ODI: किंग कोहली बनला 'सुपरमॅन'! हवेत झेप घेत पकडला अफलातून कॅच; कॅप्टन कूलचा मोडला रेकॉर्ड VIDEO

SCROLL FOR NEXT