Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: आंदोलक आक्रमक, खासदार अन् माजी मंत्र्याचे जाळले घर

श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेत अनेक आठवडे सरकारविरोधी निदर्शने सुरु असताना देशाचे संसद सदस्य आणि माजी मंत्री यांची घरे जाळण्यात आली. आंदोलकांनी माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांचे माउंट लॅव्हिनिया निवासस्थान आणि खासदार सनथ निशांत यांच्या निवासस्थानावर हल्ला केला आणि जाळपोळ केली. सोमवारी कर्फ्यू (Curfew) असलेल्या बेटावर हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांना लक्ष्य केले. महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. (Uncontrolled situation in Sri Lanka protesters set fire to the houses of MPs and former ministers)

दरम्यान, राजधानीबाहेर झालेल्या चकमकीदरम्यान एका खासदाराचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या हिंसाचारात किमान 138 जण जखमी झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यांना कोलंबो येथील राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेत, महिंदा राजपक्षे यांचे समर्थक आणि सरकारविरोधी (Government) निदर्शक यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 78 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजधानी कोलंबोमध्ये स्थानिक पोलिसांनी अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे. सोमवारी सरकारचे समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेतील अमेरिकेच्या राजदूत ज्युली चुंग यांनी सोमवारी या हिंसक संघर्षांचा निषेध केला आहे. सरकार समर्थकांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला.

तसेच, आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या चकमकींमध्ये 20 जण जखमी झाले आहेत. एएफपीने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'राजपक्षे यांच्या समर्थकांनी 9 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनाबाहेर बसलेल्या निशस्त्र निदर्शकांवर लाठीहल्ला केला.'

आधीच्या अहवालानुसार, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी कबूल केले आहे की, 'लोकांच्या निषेधानंतर देशातील राजकीय आणि आर्थिक संकटावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. या संकटाचा देशाच्या पर्यटनावर विपरीत परिणाम झाला आहे. पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कारखाने बंद होण्यापूर्वीच देशावरील आर्थिक बोजा वाढला होता.'

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री प्रसन्ना रणतुंग, नाल्का गोदाहेवा आणि रमेश पाथिराना यांनी महिंदा राजपक्षे यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तथापि, सहकारी मंत्र्यांव्यतिरिक्त मंत्री विमलपुरा दिसानायके म्हणाले की, 'महिंदाचा राजीनामा देशाच्या संकटाला तोंड देण्यासाठी निरुपयोगी ठरेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT