Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या मदतीला धावला भारत, 24 तासांत पाठवले 76 हजार टन इंधन

भारताने संकटात सापडलेल्या श्रीलंकेला 24 तासांत 76 हजार टन इंधन पाठवले आहे.
Sri Lanka crisis News
Sri Lanka crisis NewsDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने 24 तासांत 76,000 टन इंधन श्रीलंकेला (Sri Lanka) पाठवले आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट किती मोठे आहे, याचा अंदाज यावरुनच लावता येतो की, इंधन, स्वयंपाकाच्या गॅससाठी लांबच लांब रांगा नागरिकांना लावाव्या लागत आहेत. पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी (Diesel) लोकांना कित्येक तास ताटकळत राहावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नागरिकांना जाणवू लागला आहे. दुसरीकडे वीज संकटही अधिक गडद बनले आहे. तासभर वीजपुरवठा खंडित झाल्याने श्रीलंकन नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. (Sri Lanka crisis News)

दरम्यान, श्रीलंकेला अन्न आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ज्याचा थेट परिणाम जनतेवर झाला आहे. तर दुसरीकडे, कोरोना महामारीमुळे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहे. परिणामी, श्रीलंकेलाही परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे, संयोगाने, अन्न आणि इंधन आयात करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. देशात दीर्घकाळ वीज कपात झाली आहे.

Sri Lanka crisis News
Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या मदतीला धावला भारत, 24 तासांत पाठवले 76 हजार टन इंधन

तसेच, जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेला मित्र देशांकडून मदत घ्यावी लागत आहे. श्रीलंकेच्या 26 सदस्यीय कॅबिनेट मंत्र्यांनी रविवारी आर्थिक संकटावर वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला. दरम्यान, श्रीलंकेत शनिवारी संध्याकाळी 6 वाजता लागू करण्यात आलेला 36 तासांचा कर्फ्यू सोमवारी सकाळी 6 वाजता उठवण्यात आला, परंतु देशात अजूनही आणीबाणी लागू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com