रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या दोन महिन्यांनंतर संयुक्त राष्ट्रांचे सचिव अँटोनियो गुटेरेस पुढील आठवड्यात मॉस्कोला भेट देणार आहेत. यादरम्यान ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. (UN secretary-general to meet Putin in Russia)
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, व्लादिमीर पुतिन 26 एप्रिल रोजी मॉस्को येथे संयुक्त राष्ट्र सचिव अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेणार आहेत.
ब्रिटन आपला दूतावास पुन्हा सुरू करणार: बोरिस जॉन्सन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) म्हणतात की, यूके पुढील आठवड्यात युक्रेनमधील कीव येथील आपला दूतावास पुन्हा सुरू करणार आहे. जॉन्सन यांनी दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत ही घोषणा केली. CNN ने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, जोपर्यंत क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका आहे तोपर्यंत अमेरिका कीवमध्ये आपला दूतावास उघडणार नाही. कीवमध्ये 15 देशांनी त्यांचे दूतावास पुन्हा उघडले आहेत. अमेरिकेने युक्रेनला 500 दशलक्ष डॉलर मदत देण्याचा निर्णयही घेतला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध सुरूच असल्याने मारियुपोलमधील रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी तळमळत आहेत. रशियन सैनिकांनी वेढलेल्या मारियुपोलमध्ये अडकलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे की, शक्य तितक्या लवकर युद्ध संपावे. त्याच वेळी डोनेस्तकमधील स्थानिक लोकही शांततेची अपेक्षा करत आहेत. युक्रेनच्या ओडेसा शहरातील अनेक रहिवाशांनी आपली घरे सोडली आहेत. रशियन सैन्य शहरात उतरेल या भीतीने हे सर्वजण परतण्यास कचरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.