Antonio Guterres Dainik Gomantak
ग्लोबल

Antonio Guterres On Violence Against Women: जगात दर 11 मिनिटाला महिलेची हत्या

संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची धक्कादायक माहिती

Akshay Nirmale

Antonio Gguterres On Violence Against Women: महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. महिला आणि मुलींविरोधातील हिंसाचार हा जगातील सर्वात मोठे मानवाधिकार उल्लंघन आहे. जगात दर 11 मिनिटांनी एका जीवनसाथी असलेल्या महिलेचा खून होतो. आणि विशेष म्हणजे हा खून तिच्या कुटूंबातील सदस्यच करतात, अशी धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिली.

दरवर्षी 25 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिलाविरोधी हिंसाचार निर्मुलन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.

गुटेरेस यांनी जगभरातील देशांच्या सरकारांना 2026 पर्यंत महिला अधिकार संघटना आणि आंदोलनांसाठीच्या निधीत 50 टक्के वाढ करण्याचे आवाहन केले आहे. गुटेरेस म्हणाले की, कोरोना ते आर्थिक घडामोडी हे देखील महिलांवरील अत्याचाराला कारणीभूत आहेत. महिलांना दररोज ऑनलाईन हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. जगातील या अर्ध्या लोकसंख्येला भेदभाव, हिंसाचार, गैरवर्तनाचा सामना करावा लागतो.

अशा घटना आर्थिक घडामोडी आणि विकासातील महिलांच्या सहभागावर परिणाम करतात. हिंसाचार आणि भेदभावामुळेच महिलांना त्यांच्या मूळ अधिकार आणि स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे अशा घटनांचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमांची आखणी केली पाहिजे.

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात घरगुती हिंसाचाराबद्दल धक्कादायक माहिती समोर आली होती. यात जगातील 10 पैकी 1 हून अधिक महिला आणि 15 ते 49 वयोगटातील महिला स्वतःच्याच जीवनसाथीकडून लैंगिक, शारिरीक हिंसाचाराच्या बळी ठरतात, असे या अहवालात म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश; पाचजणांना अटक, हल्ल्याचे कारण येणार समोर?

Ankola Road Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अंकोलाजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार, पाच जखमी

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

SCROLL FOR NEXT