Hunger Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

UN रिपोर्ट! दररोज एक अब्ज टन वाया जातंय अन्न; 80 कोटी लोक राहतायेत उपाशी

Hunger Crisis: एकीकडे जगात भूक आणि गरिबीची पातळी वाढत आहे, तर दुसरीकडे एका दिवसात किती अन्न वाया जाते हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

Manish Jadhav

Hunger Crisis:

एकीकडे जगात भूक आणि गरिबीची पातळी वाढत आहे, तर दुसरीकडे एका दिवसात किती अन्न वाया जाते हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. संपूर्ण जगात अन्नाच्या सततच्या नासाडीबाबत संयुक्त राष्ट्र संघाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एकीकडे 80 कोटी लोकांना उपाशी राहावे लागत आहे, तर दुसरीकडे दररोज एक अब्ज टन अन्न वाया जात आहे. दरम्यान, बुधवारी UN ने फूड वेस्ट इंडेक्स नावाचा हा (Food Waste Index Report) रिपोर्ट प्रसिद्ध केला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की घरे आणि रेस्टॉरंट्सने जगातील 80 कोटी लोक भुकेले असताना एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त अन्न फेकले. हा रिपोर्ट सांगतो की, 2022 मध्ये एक अब्ज टनांहून अधिक अन्न फेकले गेले.

रिपोर्टमध्ये धक्कादायक बाबी

दरम्यान, सातत्याने होत असलेली अन्नाची नासाडी ही जागतिक शोकांतिका असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन यांनी एका निवेदनात म्हटले की, जगभरात अन्नाच्या नासाडीमुळे लाखो लोकांना आज उपाशी राहावे लागत आहे. अशा प्रकारच्या फूड वेस्टचा पर्यावरणावरही मोठा परिणाम होत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हा रिपोर्ट UN च्या सहकार्याने WRAP (Worldwide Responsible Accredited Production) या संस्थेने तयार केला आहे. रॅपचे रिचर्ड स्वानेल यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, माझ्यासाठी हे खूप धक्कादायक आहे. ते पुढे म्हणाले की, जगात 800 दशलक्ष लोक भुकेले आहेत. दररोज वाया जात असलेल्या अन्नातून आपण त्यांना एक दिवसाचे अन्न देऊ शकतो.

अन्न फेकण्यास जबाबदार कोण?

दुसरीकडे, 2022 मध्ये 28 टक्के अन्न वाया जाण्यासाठी रेस्टॉरंट्स, कँटीन आणि हॉटेल्स जबाबदार होते, परंतु सर्वात जास्त अन्न वाया घरांमधून गेले, ज्याचे प्रमाण 60 टक्के होते. (सुमारे 631 दशलक्ष टन). स्वानेल यांनी सांगितले की, हे घडले कारण लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त खाद्यान्न विकत घेत होते. रिपोर्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, अन्नाचा अपव्यय हा जगातील सुमारे 30 टक्के शेतीच्या बरोबर आहे. स्वानेल यांनी पुढे सांगितले की, अन्नाची नासाडी करण्यात मुख्य भूमिका त्याच्या एक्सपायरी डेटने निभावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT