Michelle Bachelet Dainik Gomantak
ग्लोबल

चीनी दौऱ्यावरुन UN चे मानवाधिकार अधिकारी अमेरिकेच्या निशाण्यावर

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने (America) आरोप केला की, ते या भागातील उइगर समुदायाच्या पाठीशी उभे राहण्यात अपयशी ठरले आहेत.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅचेलेट पुढील आठवड्यात चीनच्या भेटीदरम्यान शिनजियांग प्रदेशाला भेट देणार असल्याची घोषणा शुक्रवारी झाल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने आरोप केला की, ते या भागातील उइगर समुदायाच्या पाठीशी उभे राहण्यात अपयशी ठरले आहेत. (UN High Commissioner for Human Rights Michelle Bachelet is due to visit China next week)

दरम्यान, 2005 मध्ये लुईस आर्बर यांच्या भेटीनंतर बीजिंगच्या (Beijing) निमंत्रणावरुन संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार अधिकार्‍याची चीनला (China) ही पहिलीच भेट आहे. युनायटेड स्टेट्सने त्यांच्या भेटीवरुन जोरदार टीका केली आहे.

बीजिंग "नरसंहार" उइघुर: यूएस

यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा नामोउल्लेख करत पत्रकारांना म्हणाले, "आम्ही PRC शिनजियांगमधील मानवाधिकार मानकांचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक प्रवेशाची अपेक्षा करत नाही." नेड प्राइस यांनी असाही इशारा दिला की, बॅचेलेट यांनी शिनजियांगवर अहवाल जारी केलेला नाही. युनायटेड स्टेट्स आणि इतर अनेक पाश्चात्य देशांनी चीनवर आरोप केला की, बीजिंग उइगर आणि तुर्की भाषिक मुस्लिम लोकांचा "नरसंहार" करत आहे.

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र (United Nations) मानवाधिकाराचे सर्वोच्च अधिकारी सोमवारी सहा दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. या दौऱ्यात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅचेलेट या शिनजियांग प्रदेशाला भेट देणार असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

बॅचेलेट चीनच्या अनेक शहरांना भेट देणार आहेत

मानवाधिकार गट आणि काही पाश्चात्य देशांची सरकारे असा आरोप करतात की, चीन सरकार शिनजियांग प्रदेशात उइगर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्याकांची (Minorities) हत्या करत आहे. दुसरीकडे मात्र, चीन सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. बॅचेलेट ग्वांगझू, काशगर आणि शिनजियांगची प्रादेशिक राजधानी उरुमकीला भेट देतील.

त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, 2005 नंतर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तांची चीनला ही पहिली भेट असेल. त्या उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि स्थानिक अधिकारी, नागरी समाज संस्था, व्यावसायिक प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ज्ञांच्या बैठका घेणार आहेत. त्या ग्वांगझू विद्यापीठात व्याख्यान देणार असल्याचेही कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT