Ukraine Dainik Gomantak
ग्लोबल

UN जनरल असेंब्लीने मानवाधिकार परिषदेतून रशियाची केली हकालपट्टी

यूएन जनरल असेंब्लीने रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित केले आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित केले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील (Ukraine) बुचा शहरात झालेल्या हत्येनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. जागतिक संघटनेच्या प्रमुख मानवाधिकार संघटनेतून (Human Rights Council) रशियाला (Russia) निलंबित करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बुचा गावातून रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर अनेक युक्रेनियन लोक मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. दुसरीकडे मात्र मॉस्कोने ही घटना खोटी असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "बुचामध्ये रशियन सैन्याने नरसंहार केलाय.'' (UN General Assembly suspends Russia from Human Rights Council)

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनियन नागरिकांच्या मृत्यूमागे रशियाचा कोणताही हात नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांवर हे वृत्त खोटे असल्याचा आरोप केला आहे. रशियाने बुचामध्ये केलेल्या या हत्याकांडाचा अमेरिका, ब्रिटनसह अनेक युरोपीय देशांनी तीव्र निषेध केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "जेव्हा बुचामध्ये काय घडत आहे ते पाहता, ते नरसंहारापेक्षा जास्त काही नाही.''

तसेच, बुचामधून नरसंहाराचे व्हिडिओ समोर आल्यानंतर रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अमेरिकेने काल रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या मुलींवर तसेच रशियाच्या सर्वोच्च सार्वजनिक आणि खाजगी बँकांवर निर्बंध जाहीर केले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव आणि रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव आणि पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांच्यासह रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. युक्रेनवरील हल्ल्याबाबत देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि उच्चभ्रू वर्गावर आणखी दबाव वाढवण्याचा प्रयत्न म्हणून या निर्बंधांचा विचार केला जात आहे.

शिवाय, अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकून, ब्रिटनने बुधवारी जाहीर केले की, ''रशियावर आणखी निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यात देशातील सर्वात मोठी बँक Sberbank च्या मालमत्तेच्या व्यवहारांवर पूर्ण बंदी आणि ब्रिटनकडून रशियामधील सर्व गुंतवणूक समाप्तीचा समावेश आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: सिराज 5 विकेट घेणार, माजी गोलंदाजांचे बोलणे ठरले खरे; ट्विट होतेय Viral

Rashi Bhavishya 05 August 2025: घरात मंगल कार्याची चर्चा, बँक व्यवहारात फायदा; संयमाने व्यवहार करा

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदल कधी? दामू नाईकांनी टाळले उत्तर, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी..

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

SCROLL FOR NEXT