Zelenskyy-Biden Meet Dainik Gomantak
ग्लोबल

Zelenskyy-Biden Meet: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अचानक अवतरले अमेरिकेत

हल्ल्याच्या भीतीने दौऱ्याबाबत अत्यंत गुप्तता; आधी रेल्वेने पोलंडपर्यंत प्रवास

Akshay Nirmale

Zelenskyy-Biden Meet: रशियासोबतच्या युद्धामुळे पाश्चिमात्य देशांत हिरो बनलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमेरिकेला भेट दिली आहे. रशियाबरोबरच्या युद्धानंतर झेलेन्स्कीचा हा पहिलाच विदेश दौरा होता. अमेरिकेने झेलेन्स्की यांच्या दौऱ्यात अत्यंत कडेकोट सुरक्षा पुरवली होती. (Russia-Ukraine War)

झेलेन्स्की यांच्या भेटीच्या कार्यक्रमाबाबतही गुप्तता पाळण्यात आली होती. 11 डिसेंबर रोजी दोन्ही झेलेनस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात चर्चा झाली होती. तीन दिवसांनी त्याला निमंत्रण मिळाले. बुधवारी सकाळी प्रवास निश्चित होताच संपूर्ण कार्यक्रम गोपनीय पद्धतीने पार पाडण्यात आला.

युक्रेनच्या आकाशात रशियन क्षेपणास्त्रांचा धोका पाहून झेलेन्स्की यांच्या या दौऱ्यात वॉशिंग्टनच्या प्रवासाची सुरवात ट्रेनने झाली होती. गुप्त पद्धतीने ते रात्रभर ट्रेनमध्ये प्रवास करून पोलंडला पोहोचले. बुधवारी ते पोलंडच्या सीमावर्ती शहराच्या रेल्वे स्टेशनवर दिसून आले. येथे मोटारींचा ताफा त्यांची वाट पाहत होता. झेलेन्स्की आणि त्याची टीम कारमधून निघाली.

अमेरिकेच्या एअर फोर्सचे बोईंग सी-40 बी या विमानाने या ठिकाणाहून उड्डाण केले. त्यापुर्वी नाटोच्या हेर विमानांनी झेलेन्स्की यांचे विमान उत्तर समुद्रात पोहोचण्यापूर्वी संपूर्ण परिसर स्कॅन केला. रशियन पाणबुड्या या समुद्रात गस्त घालत असतात, त्यामुळे ही काळजी घेण्यात आली. या समुद्रातील इंग्लंडच्या तळावरून अमेरिकेच्या एका F-15 लढाऊ विमानाने देखील उड्डाण केले. या विमानाने झेलेन्स्कीच्या विमानाला वॉशिंग्टनपर्यंत सोबत केली.

उड्डाणानंतर सुमारे 10 तासांनंतर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष दुपारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले, जिथे त्यांना इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे गुप्तचर खात्याची संरक्षण व्यवस्था पुरविण्यात आली. अमेरिकेच्या संसदेत झेलेन्स्की यांना स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले. दोन दिवस प्रवास करून ते झेलेन्स्की पुन्हा युक्रेनला परतले आहेत.

दरम्यान, रशियाची एकमेव विमानवाहू नौका अ‍ॅडमिरल कुझनेत्सोव्हला आग लागली. तथापि येथील 20 जणांना वाचवण्यात यश आले. ही विमानवाहू युद्धनौका प्रदीर्घ दुरुस्तीनंतर काही दिवसांत नौदलाला मिळणार होती. त्यानंतर ती समुद्रात तैनात करण्यात येणार होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT