Antonio Guterres Dainik Gomantak
ग्लोबल

संयुक्त राष्ट्राचे सचिव गुटेरेस यांच्या रशिया दौऱ्याकडे युक्रेनचे लक्ष

रविवारी रशियन गोळीबारामुळे खार्किवमध्ये दोन लोक ठार झाले.

दैनिक गोमन्तक

रशिया दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्राचे सचिव अँटोनियो गुटेरेस युक्रेनला भक्कम पाठिंबा देतील, अशी आशा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. गुटेरेस 26 एप्रिल रोजी रशिया दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Ukraine's eye on UN chief's Russia tour)

झेलेन्स्की म्हणाले की त्यांना अँटोनियो गुटेरेस यांच्याकडून 100 टक्के समर्थन अपेक्षित आहे. गुटेरेस 28 एप्रिल रोजी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचीही भेट घेणार आहेत. गुटेरेस सोमवारी तुर्की आणि त्यानंतर मॉस्को आणि कीवला भेट देणार आहेत.

रविवारी रशियन गोळीबारामुळे खार्किवमध्ये दोन लोक ठार झाले तर 14 लोक जखमी झाले. दुसरीकडे, युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्य खार्किवचा ताबा मिळवण्यात अपयशी ठरले आहे.

युक्रेनला अमेरिका आणि युरोपने पाठवलेल्या शस्त्रांवर रशिया हल्ला करत आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, रशियन सैन्याने युक्रेनच्या ओडेसाजवळील लष्करी विमानतळावर हल्ला केला जेथे परदेशी शस्त्रे ठेवण्यात आली होती. मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी रविवारी सांगितले की, रशियन सैन्याने मध्य युक्रेनमधील डनिप्रो प्रदेशातील पावलोहराड जवळ स्फोटकांचा कारखाना नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा वापर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT