Drone Attacks In Moscow  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनचा मोठा पलटवार, 50 हून अधिक ड्रोन हल्ल्याने हादरला रशिया; संपूर्ण मास्कोत हाहाकार

Drone Attacks In Moscow: रशिया-युक्रेन युद्धाला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मार्चमध्ये झालेल्या रशियन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून रशियन सैन्य अधिक आक्रमक झाले आहे.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मार्चमध्ये झालेल्या रशियन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून रशियन सैन्य अधिक आक्रमक झाले आहे. गेल्या महिनाभरात रशियाने युक्रेनवर अनेक मोठे आणि विनाशकारी हल्ले केले, मात्र आता युक्रेननेही रशियावर जोरदार पलटवार केला आहे. युक्रेनच्या लष्कराने एकाच वेळी सुमारे 50 ड्रोनने रशियावर हल्ला केला. यामुळे संपूर्ण मॉस्कोमध्ये हाहाकार उडाला आहे. याआधी पुतिन यांच्या लष्कराने युक्रेनवर एकापाठोपाठ अनेक मोठे हवाई हल्ले केले होते, ज्यामध्ये डझनभर लोक मारले गेले आणि युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांसह शेकडो इमारती नष्ट झाल्या.

दरम्यान, युक्रेनने रशियाच्या सीमावर्ती भागात रोस्तोव्हवर 50 हून अधिक ड्रोनने हल्ला केला. मॉस्कोच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. युक्रेनने रशियाच्या भूमीवर केलेल्या या हल्ल्याकडे आतापर्यंतच्या युद्धातील सर्वात मोठ्या हवाई हल्ल्यांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, मोरोजोवस्की जिल्ह्यात एकूण 44 ड्रोन दिसले आणि नष्ट केले गेले.

रशियाला मोठा झटका

दुसरीकडे, रशियाच्या सीमा भागात ड्रोन उडताना दिसले. रोस्तोव्हचे गव्हर्नर वसिली गोलुबेव्ह यांनी सांगितले की, या हल्ल्यात ऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियाच्या कुर्स्क, बेल्गोरोड, क्रास्नोडार आणि जवळच्या साराटोव्ह प्रदेशाच्या सीमा भागात आणखी नऊ ड्रोन दिसले आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी अशा हल्ल्यांवर भाष्य किंवा प्रतिक्रिया दिली नाही.

तसेच, युक्रेनसोबतच्या युद्धात इतर देशांच्या हस्तक्षेपाबाबत पुतिन यांनी सातत्याने आपली भूमिका मांडली आहे. पुतिन यांनी अलीकडेच, नाटोने युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. पुतिन यांनी मोठा हल्ला करण्याची औपचारिक धमकी दिली होती. पुतीन यांच्या धमकीचा परिणाम असा झाला की, त्यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची घोषणा मागे घेतली.

दरम्यान, इथे आपण नाटो देश पोलंडबद्दल बोलत आहोत. नाटो सदस्य पोलंडने युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची आमची कोणतीही योजना नाही, असे पोलंडने एका नव्या निवेदनात म्हटले आहे. पुतिन यांच्या धमकीनंतर पोलंडने हे केल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचे मत आहे. पोलंडने म्हटले की, ते युक्रेनियन सेवा सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सैन्य पाठवणार नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांनी सैन्य पाठवल्यास अणुयुद्धाचा इशारा दिला होता.

पाश्चात्य हस्तक्षेपावर पुतिन संतापले

पुतिन यांनी अलीकडेच पश्चिमेकडील देशांना अणुयुद्धाची धमकी दिली आहे. पाश्चात्य देश युक्रेनला मदत करत राहिल्यास आम्ही त्यांच्या सीमाक्षेत्रात ठेवलेल्या अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागे हटणार नाही, हे त्या देशांनी विसरु नये, असे पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT