Russia-Ukraine war  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War : युद्धात आतापर्यंत 16,600 रशियन सैनिक मारले गेले

युद्धाच्या 32 व्या दिवशी युक्रेनचा मोठा दावा; आतापर्यंत 16,600 रशियन सैनिक मारले गेले

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध महिनाभरानंतरही सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. तर या युद्धात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे. यादरम्यान युक्रेनने मोठा दावा केला असून युद्धाच्या 32 व्या दिवशी आतापर्यंत 16,600 रशियन सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे. (Ukraine claims 16,600 Russian soldiers killed since war began)

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 32 वा दिवस असून युद्धाच्या 31 व्या दिवसापर्यंत रशियाने युक्रेनवर हल्ला करणे सुरूच ठेवले आहे. या हल्ल्यांमध्ये युक्रेनला मोठा फटका बसला आहे. मात्र, युक्रेनचे सैन्य (Ukrainian forces) किंचीत ही मागे हटलेले नाहीत. ते रशियाला प्रत्युत्तर दिले आहेत.

त्याचवेळी, अमेरिकेकडून युक्रेनला मदत म्हणून $100 दशलक्ष रूपये देणार आहे. युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाची सीमा सुरक्षा प्रदान करणे, कायद्याची अंमलबजावणी करणारी कार्ये राखणे आणि गंभीर सरकारी पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे यासाठी या मदतीचा हेतू आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्रपति जो बाइडेन यांनी रशिया-युक्रेन युद्ध आता दुसऱ्या महिन्यात आले असून या युद्धाने पश्चिमेला एकत्र केले आहे. तर रशियाचे अध्यक्ष पुतीन हे कसाई आहेत असे म्हटले होते.

दरम्यान युक्रेनवर आपली पकड अधीक घट्ट करण्यासाठी रशियाने क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. तर अशाच एका हल्ल्यात युक्रेनच्या रिव्हने ओब्लास्टमधील तेलाचा डेपो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रिव्हनेचे राज्यपाल विटाली कोवल यांनी सांगितले आहे. तर यावेळी युक्रेनच्या सशस्त्र दलाने दावा आहे की, जेव्हापासून युद्ध सुरू झाले आहे, तेव्हापासून 27 मार्चपर्यंत रशियाला मोठा फटका बसला आहे. युक्रेनच्या (Ukraine) म्हणण्यानुसार, युद्धात आतापर्यंत 16,600 रशियन सैनिक मारले गेले आहेत.

तसेच यूके संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, रशियन सैन्याने (Russian forces) डॉनबासमध्ये युक्रेनियन सैन्याला घेरण्याच्या प्रयत्नावर लक्ष केंद्रित केले आहे. मंत्रालयाने 27 मार्च रोजी सांगितले की रशियन सैन्य उत्तरेकडील खार्किव आणि दक्षिणेकडील मारियुपोल मार्गे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT