BRITAIN Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनमध्ये 40 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप

30 वर्षातील सर्वात मोठा संप ; राजधानी मेट्रो वाहतूक ठप्प

दैनिक गोमन्तक

जगभरात बेरोजगारीचा प्रश्न कमी अधिक प्रमाणात सर्व ठिकाणी पहायला मिळतो. तसेच नोकरीच्या ठिकाणी असलेले प्रश्न यांच्यावरुन ही अनेक समस्या आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी पगार आणि नोकरीच्या सुरक्षेच्या निमित्ताने समस्यांचे निवारण प्रशासनाने करावे यासाठी हा संप करण्यात आला होता. याचा परिणाम म्हणून ब्रिटनमध्ये आज अपवाद वगळता रेल्वे धावली नाही. (uk train strike over 40000 railway employees refused to work )

या संपामुळे दररोज धावणाऱ्या 20 हजार गाड्यांपैकी केवळ 4500 गाड्या सुरू आहेत. अनेक रेल्वे कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेलेले नाहीत, मात्र नेटवर्क रेल्वे सिग्नलर निघून गेल्याने गाड्यांच्या वाहतुकीला अडचणी येत आहेत. ब्रिटनमधील बहुतांश भागात दिवसभर एकही प्रवासी ट्रेन धावली नाही. यामुळे स्कॉटलंड, वेल्स, कॉर्नवॉल, लिंकन आणि वॉर्सेस्टर यांसारख्या भागांना खूप त्रास सहन करावा लागला.

दुसरीकडे, बुधवार, शुक्रवार आणि रविवारीही रेल्वे वाहतुकीत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, लंडनमधील मेट्रो कर्मचारीही आज 24 तासांच्या संपावर आहेत, त्यामुळे राजधानीची मेट्रो वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. सोमवारी झालेल्या अयशस्वी चर्चेसाठी दोन्ही बाजू एकमेकांवर आरोप करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT