Rishi Sunak Dainik Gomantak
ग्लोबल

Rishi Sunak Statement on Women: किती टक्के महिलांना पुरूषांसारखे लिंग नसते? पंतप्रधान सुनक यांनी काय दिले उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

Rishi Sunak Statement on Women: ब्रिटेनमध्ये सध्या ट्रान्सजेंडर मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यावरून अलिकडे लेबर पार्टीचे प्रमुख आणि ब्रिटीश संसदेतील विरोधी पक्षनेते सर केयर स्ट्रॅमर यांनी केलेल्या एका विधानावरून उलट सुलट चर्चा होत आहे.

याच विधानाबाबत यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनक यांनी दिलेले उत्तर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अलिकडे कंझर्व्हेटिव्हहोमला एक मुलाखत दिली. लेबर पार्टीचे नेते सर केयर स्ट्रॅमर यांनी, 99.9 टक्के महिलांना पुरूषांसारखे लिंग नसते असे वक्तव्य केले होते. याबाबत सुनक यांना प्रश्न विचारण्यात आला.

सुनक तुम्ही यामध्ये किती टक्के वाढवाल? असा प्रश्न सुनक यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुनक हसले. नंतर त्यांना हा आकडा शंभर टक्के आहे का? असे विचारण्यात आले त्यावर सुनक 'नक्कीच' असे म्हणाले.

पण, ज्यावेळी महिलांच्या हक्क संरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळी त्यांच्या जैविक लैंगिकतेचा मुद्दा महत्वाचा वाटतो. असेही सुनक यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रिटनमध्ये सध्या लिंग विषयक कायद्यांवर चर्चा केली जात आहे. अशात सुनक यांनी केलेली टिप्पणी महत्वाची मानली जात आहे. ब्रिटीश सरकार विशिष्ट लिंगात जन्मलेली व्यक्ती आणि लिंग बदल केलेली व्यक्ती यांच्यातील समानता कायद्यांत काही बदलांचा विचार करत आहे.

यूकेचा समानता कायदा ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांना चेंजिंग रूम आणि निवारा यासारख्या सिंगल-सेक्स स्पेसमधून वगळण्याची परवानगी देतो.

या वर्षाच्या सुरुवातीला, ब्रिटीश सरकारने स्कॉटलंडने सादर केलेली लिंग सुधारणा विधेयके थांबवली आहेत. लिंग ओळख सुधारणा विधेयकामुळे लोकांना त्यांचे कायदेशीर मान्यताप्राप्त लिंग बदलणे सोपे होते असा दावा करणाऱ्या स्कॉटिश अधिकार्‍यांनी या निर्णयाचा निषेध केला. तसेच, विधेयके थांबवल्याबाबत आवाज उठवणार असल्याचे स्कॉटिश सरकारने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT