Boris Johnson | UK Political Crisis Live Updates Dainik Gomantak
ग्लोबल

बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा, सेक्स स्कँडल प्रकरणात गमावली खुर्ची

ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील 39 मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

दोन मंत्र्यांनी पायउतार झाल्यानंतर ब्रिटनमधील राजकीय संकट अधिकच गडद होताना आपल्याला दिसून येत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षातील बंडखोरीनंतर 39 मंत्री आणि संसदीय सचिवांनी राजीनामे दिले असल्याचे आता समोर आले आहे. (UK Prime Minister Boris Johnson resign)

गृहमंत्री प्रिती पटेल (Priti Patel) यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगण्यात येत आहे. पार्टीगेट प्रकरणी विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आता UKमिडिया रिपोर्टनुसार बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देण्याची तयारी केल्याचे वृत्त येत आहे.

ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या मंत्रिमंडळातील 39 मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. यानंतर पीएम जॉन्सन यांच्यावर खुर्ची सोडण्याचा दबावही खूप वाढला. गेल्या महिनाभरात बोरिस जॉन्सन यांच्या खुर्चीवर संकट येण्याची ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे अशा अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे जे यापूर्वी जॉन्सन यांचे कट्टर समर्थक होते. गेल्या वेळी ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि साजिद जाविद (Sajid Javid) यांनी सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, पण त्यांनीही पीएम जॉन्सनची बाजू सोडली होती.

ख्रिस पिंचरचा नेमका वाद काय आहे?

ब्रिटनमध्ये खासदार ख्रिस पिंचर (Chris Pincher) यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत लैंगिक गैरवर्तन आणि लोकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची माहिती असूनही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांना पदोन्नती दिली होती, त्यानंतर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न देखील उपस्थित झाले होते. सरकारला मात्र याचा चांगलाच फटका बसला आहे. विरोधी पक्ष हल्लेखोर तर होताच, शिवाय जॉन्सन यांच्या पक्षाचे खासदारही प्रश्न उपस्थित करत होते. बोरिस जॉन्सन यांनी नंतर स्पष्ट केले की ख्रिस पिंचरची पदोन्नती हा चुकीचा निर्णय होता आणि जॉन्सन यांना 'पार्टी गेट' एपिसोडने घेरले होते तेव्हा हा मुद्दा चर्चेत होता. (UK Political Crisis Live Updates)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT