Kim Jong-un Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea Executes 2 Boys: चित्रपट पाहिल्याने उत्तर कोरियाच्या दोघा विद्यार्थ्यांना घातल्या गोळ्या

किम जोंग उन यांच्या क्रौर्याचे आणखी एक उदाहरण, सर्वांसमोर मृत्यूदंडाची शिक्षा

Akshay Nirmale

North Korea Executes 2 Boys: उत्तर कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. त्यांची चूक एढीच होती की, त्यांनी दक्षिण कोरियामध्ये बनलेले दोन शो पाहिले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांचे वय 15-16 वर्षे इतके होते. त्यांना भरदिवसा सर्वांसमोर गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात सतत तणाव असतो. त्यामुळचे दक्षिण कोरियात बनलेले शोज, चित्रपट पाहण्यावर उत्तर कोरियात बंदी आहे. ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली असून आत्ता डिसेंबरमध्ये या घटनेला वाचा फुटली आहे.

ही शिक्षा पाहणाऱ्या एकाने सांगितले की, त्यांना ती शिक्षा पाहण्यासाठी सक्ती केली गेली. राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांना हेसन शहरात राहणाऱ्या नागरिकांनी एका मोकळ्या मैदानात एकत्र होण्यास सांगितले. तिथे काही अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना ही शिक्षा दिली.

दक्षिण कोरियन ड्रामा आणि म्युझिकची वाढती लोकप्रियता पाहून उत्तर कोरियाने 2020 मध्ये एक कायदा मंजूर केला होता. त्यानुसार देशाची संस्कृती जपण्यासाठी परदेशी चित्रपट, शोज यावर बंदी आहे.

हे दोन्ही विद्यार्थी उत्तर कोरियाच्या रियांगगँग प्रांतातील हास्यकूलमध्ये शिकत होते. दोघांनी अनेक दक्षिण कोरियाई आणि अमेरिकन चित्रपट पाहिले होते. त्यांच्यावर दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही कोरियन ड्रामा दाखविल्याचा आरोप आहे. हा कोरियन ड्रामा त्यांनी इतर विद्यार्थ्यांमध्ये शेअरही केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

Konkani Drama Competition: वृद्धांच्या व्यथा मांडणारी उत्कृष्ट कलाकृती, 'बापू-गांधी'

SCROLL FOR NEXT