China: ड्रॅगनची धूर्त चाल, आपल्याच नागरिकांची जासूसी करण्यासाठी उघडली 100 पोलिस स्टेशनं!

China President Xi Jinping: भारत, अमेरिकेसह जगभरातील बहुतांश देशांना चीनची हुशारी चांगलीच ठाऊक आहे. अलीकडेच एका अहवालातून चीनबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
 China President Xi Jinping
China President Xi JinpingDainik Gomantak

Chinese Police Stations: भारत, अमेरिकेसह जगभरातील बहुतांश देशांना चीनची हुशारी चांगलीच ठाऊक आहे. अलीकडेच एका अहवालातून चीनबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. खरेतर, चीनने एका धूर्त चालीने जगभरात आपली 100 हून अधिक पोलीस ठाणी उघडली आहेत.

दरम्यान, चीनने (China) उघडलेल्या या पोलीस ठाण्यांमागचे कारणही सीएनएनच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या माध्यमातून चीनला परदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांवर (Citizens) नजर ठेवायची आहे, असा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच तिथे राहणाऱ्या चिनी नागरिकांना त्रास देणे आणि त्यांना परत आणणे हेही या पोलिस ठाण्यांचे काम आहे. माद्रिद-आधारित मानवाधिकार प्रचारक सेफगार्ड डिफेंडर्स यांनी सप्टेंबरमध्ये पोलिस ठाण्यांचा पर्दाफाश केला.

 China President Xi Jinping
China Will Send Monkey In Space: चीन माकडांना पाठवणार अंतराळ स्थानकात

दुसरीकडे, "गस्त आणि पर्सुएड" या शीर्षकाच्या अहवालात पुढे म्हटले की, व्यापक आंतरराष्ट्रीय उपस्थिती मिळविण्यासाठी चीनने काही युरोपियन आणि आफ्रिकन देशांसोबत द्विपक्षीय सुरक्षा व्यवस्था करार केले आहेत. ही स्थानके इटली, क्रोएशिया, सर्बिया आणि रोमानियामध्येही आहेत. पॅरिसमध्ये गुप्तपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एका चिनी नागरिकाला मायदेशी परतण्यास भाग पाडल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. तत्पूर्वी, सर्बिया आणि स्पेनमधून इतर दोन चिनी निर्वासितांनाही मायदेशी परतावे लागले होते.

चीनचे उत्तर - अतिशयोक्ती करणे थांबवा

सेफगार्ड डिफेंडर्स यांचे म्हणणे आहे की, 'आम्ही किमान 53 देशांमध्ये कार्यरत असलेल्या चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाची चार स्वतंत्र पोलिस स्थानके ओळखली आहेत. ही स्थानके चीनच्या त्या भागांतील प्रवासी लोकांच्या गरजा पूर्ण करतात. मात्र, बीजिंगने परदेशात अशी पोलिस ठाणी चालवण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.'

 China President Xi Jinping
Missile Technology: चीन अन् पाकच्या क्षेपणास्त्र तळांबाबत या अहवालातून मोठा खुलासा

दुसरीकडे, चीनने गेल्या महिन्यात सीएनएनला सांगितले की, "आम्हाला आशा आहे की, संबंधित पक्ष तणाव निर्माण करण्यासाठी अतिशयोक्ती करणे थांबवतील. चीनची बदनामी करण्यासाठी निमित्त म्हणून त्याचा वापर करणे अस्वीकार्य आहे." चीनचा दावा आहे की, 'ही स्थानके चिनी प्रवासींना कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यास मदत करण्यासाठी प्रशासकीय केंद्र आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com