Blue Flag Beaches  Dainik Gomantak
ग्लोबल

Blue Flag Beaches: जगातील सर्वात स्वच्छ समुद्र किनाऱ्यांमध्ये भारतातील आणखी दोन किनाऱ्यांचा समावेश

देशातील एकुण 12 समुद्रकिनाऱ्यांचा यादीत समावेश; पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

गोमन्तक डिजिटल टीम

Blue Flag Beaches: जगातील सर्वात स्वच्छ समुद्र किनाऱ्यांमध्ये भारतातील आणखी दोन समुद्र किनाऱ्यांचा समावेश झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव यांनी दिली. या समुद्र किनाऱ्यांना मानाचा ब्ल्यू फ्लॅग देण्यात आला आहे. या निवडीनंतर भारतातील ब्ल्यू बीचेसची संख्या आता 12 वर गेली आहे.

लक्षद्वीप येथील थुंडी आणि कडमत अशी या नव्या दोन समुद्र किनाऱ्यांची नावे आहेत. हा अभिमानाचा क्षण आहे, हा शाश्वत पर्यावरणासाठी केलेल्या भारताच्या अथक प्रयत्नांचा भाग आहे, असे ट्विट भुपिंदर यादव यांनी केले आहे.

लक्षद्वीपवरील थुंडी किनाऱ्यावर पांढरी वाळू आहे. तर कडमत किनारा हा क्रुझ पर्यटकांमध्ये वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून लक्षद्वीपच्या नागरिकांचे अभिनंदन करताना ही उत्तम यश असल्याचे म्हटले आहे.

देशातील या समुद्रकिनाऱ्यांचा यादीत समावेश

या यादीतील इतर समुद्रकिनाऱ्यांमध्ये गोल्डन बीच (ओडिशा), शिवराजपुर (गुजरात), कप्पड (केरळ), घोघला (दिव), राधानगर (अंदमान आणि निकोबार), कासारकोड (कर्नाटक), पदुबिद्री (कर्नाटक), ऋषीकोंडा (आंध्र प्रदेश), कोवलम (तामिळनाडू), एडन (पुदुच्चेरी) या किनाऱ्यांचा समावेश आहे.

पुरीतील गोल्डन बीच हा आशियातील पहिला ब्ल्यू फ्लॅग मिळालेला किनारा आहे. गतवर्षी त्यात कोवलम आणि एडन या किनाऱ्यांचा समावेश झाला होता. फाऊंडेशन फॉर एनव्हायर्नमेंटल एज्युकेशन (एफईई) या ना नफा तत्वावर आधारीत संघटनेमार्फत हा ब्लू फ्लॅग दिला जातो.

जगातील सर्वात स्वच्छ समुद्र किनाऱ्यांना हे लेबल दिले जाते. त्यासाठी 33 निकष पाळावे लागतात. पर्यावरण, शिक्षण, सुरक्षितता यांवर आधारीत हे निकष आहे. या संस्थेचे मुख्यालय कोपेनहेगन, डेन्मार्क येथे आहे. सध्या 77 देश या संघटनेचे सदस्य आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

SCROLL FOR NEXT