Former General Soleimani Dainik Gomantak
ग्लोबल

Iran: इराणमध्ये माजी जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ दोन स्फोट, 103 जणांचा मृत्यू

Former General Soleimani: यातच आता, इराणमधील माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन मोठे स्फोट झाले. या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 73 वर पोहोचली आहे.

Manish Jadhav

Former General Soleimani: नववर्षाच्या मुहूर्तावर हमासविरुद्ध कडवा लढा देण्याची घोषणा करणाऱ्या इस्रायलला आणखी एका दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचा धोका आहे. यातच आता, इराणमधील माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन मोठे स्फोट झाले. या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 103 वर पोहोचली आहे. तर 140 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. इराणचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कबरीजवळ आयोजित कार्यक्रमाला लक्ष्य करुन हा स्फोट घडवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान इराणने या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुलेमानी यांचा अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता.

रिपोर्टनुसार, पहिला स्फोट इराणच्या केरमन शहरात माजी इराणी लष्कर जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ झाला. त्यानंतर दुसरा स्फोट झाला, ज्यात 103 जणांचा मृत्यू झाला. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीजवळ हा स्फोट झाला. मात्र, हा स्फोट गॅस सिलिंडरमुळे झाला की हा दहशतवादी हल्ला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्फोटांनंतर चेंगराचेंगरी

वृत्तानुसार, ज्या स्मशानभूमीत हे बॉम्बस्फोट झाले, त्याच ठिकाणी माजी जनरल सुलेमानी यांची कबर आहे. बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यांच्या मृत्यूची चौथी पुण्यतिथी साजरी होत होती. स्फोटानंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. सध्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. चेंगराचेंगरीमुळे अनेक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माजी जनरलचा मृत्यू कसा झाला?

दरम्यान, 3 जानेवारी 2020 रोजी बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात माजी जनरल सुलेमानी मारले गेले. सुलेमानी हे इराणमधील शक्तिशाली व्यक्तिमत्त्व होते. सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर ते इराणमधील दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जात होते. 2020 मध्ये, ट्रम्प यांनी सुलेमानी यांच्या मृत्यूला सर्वात मोठा विजय म्हणून वर्णन केले होते आणि त्यांनी त्यांना जगातील नंबर वन दहशतवादी देखील म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT