Twitter Dainik Gomantak
ग्लोबल

Twitter मुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाहीला धोका निर्माण होतोयं- माजी अधिकाऱ्यांचा आरोप

सुरक्षा प्रमुख पीटर जाटको यांनी ट्विटरवरील त्रुटींचा आरोप करत यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

Complaint Against Twitter: माजी सुरक्षा प्रमुख पीटर जाटको (Peiter Zatko) यांनी ट्विटर कंपनीवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरमुळे अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवर सुरक्षा पद्धतींमध्ये निष्काळजीपणाचा आणि त्याबद्दल फेडरल नियामकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. एवढच नाही तर ट्विटर बॉट्सची संख्या मिसळल्याचा आरोपही केला आहे. बॉट म्हणजे रोबोट. बॉट हा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो स्वयंचलित, पुनरावृत्ती पूर्व-सेट कार्ये करतो.

पीटर जाटकोला निक नेक मुज म्हणूनही ओळखले जाते. पीटरने ट्विटरवरील त्रुटींचा आरोप करत यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे. अमेरिकन मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या पीटर जाटकोच्या तक्रारीत ट्विटरने फेक आणि स्पॅम अकाउंट्सची संख्या कमी लेखल्याचा आरोप केला आहे.

जाटकोच्या तक्रारीचा फायदा एलन मस्कला होणार!

दिग्गज उद्योगपती एलन मस्कने देखील ट्विटरवर बॉट्सच्या गडबडीचा आरोप लावला होता. जाटकोच्या तक्रारीमुळे कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात मस्कला दिलासा मिळू शकतो. 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द झाल्यानंतर मस्क यांना न्यायालयात खेचण्यात आले. मार्केट वॉचडॉग सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसह अधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत, जॅटकोने ट्विटरवर निष्काळजीपणा, जाणूनबुजून अज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे.

ट्विटर कंपनी काय म्हणते?

दरम्यान, अकार्यक्षम नेतृत्व आणि खराब कामगिरीमुळे जाटकोला या वर्षी जानेवारीमध्ये काढून टाकण्यात आल्याचे ट्विटर कंपनीच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले. प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही आतापर्यंत जे निरीक्षण केले आहे ते असे आहे की ट्विटर आणि आमची गोपनीयता आणि डेटा सुरक्षिततेबद्दल एक खोटी माहिती पसरवली जात आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT