Twitter | Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Twitter Layoff: ट्विटरमध्ये पुन्हा कर्मचारी कपात; आता 'या' दोन देशातील कामगारांना कामावरून काढले...

गतवर्षी कंपनीतील 50 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने दिला आहे 'नारळ'

Akshay Nirmale

Twitter Layoff: ट्विटरचे सीईओ आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ट्विटरमध्ये नोकरकपात केली आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी मस्क यांनी दोन देशातील कार्यालयातून डझनभर कामगारांना काढून टाकले आहे. हे देश आहेत सिंगापूर आणि डब्लिन.

या कर्मचारी कंपातीत कंपनीतील अनेक अधिकाऱ्यांनाही नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यावेळी द्वेषयुक्त भाषणाच्या बाबी पाहणाऱ्या ग्लोबल कंटेंट मॉडरेशन टीम आणि ट्रस्टमध्ये नोकर कपात करण्यात आली आहे. मस्क यांनी आशिया पॅसिफिक क्षेत्राच्या साइड इंटिग्रिटीचे प्रमुख नूर अझहर बिन अयुब आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ संचालक अॅनालुईसा डोमिंग्वेझ यांना काढून टाकले आहे.

याशिवाय मस्कने स्टेट मीडिया, मिस इन्फॉर्मेशन पॉलिसी आणि ग्लोबल अपील या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकले आहे. 2022 मध्ये कंपनीने आधीच 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आधीच वाढला आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये, मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली. तेव्हापासून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्विटरने नोव्हेंबर महिन्यात आपल्या सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अशा परिस्थितीत सुमारे 3,700 लोकांना नोकरी गमवावी लागली. यानंतर मस्कने 'ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस' सुरू केली.याद्वारे कंपनी आपल्या ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांकडून दर महिन्याला शुल्क आकारायला सुरवात केली. अँड्रॉइड वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी प्रति महिना $ 8 फी भरावी लागेल. तर, आयफोन वापरकर्त्यांना यासाठी दरमहा $ 11 द्यावे लागतील. या निर्णयांद्वारे मस्क ट्विटर डीलची किंमत भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT