Turkey Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Earthquake: तुर्की पुन्हा भूकंपाने हादरला, 6.3 रिश्टरच्या धरणीकंपामुळे 3 ठार

सोमवारी तुर्कीला पुन्हा भूकंपाचे मोठे धक्के बसले.

दैनिक गोमन्तक

Turkey-Syria Earthquake Updates: तुर्कीवरचे संकट काही पाठ सोडेना! तुर्कीत भूकंपाच्या धक्क्यांची मालिका ही सुरूच आहे. दोन आठवड्यापूर्वी आलेल्या भूकंपात 46 हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तुर्की सिरियात भूकंपाचे धक्के हे जाणवत आहेत.

सोमवारी म्हणजेच 20 फेब्रुवारीला पुन्हा भूकंपाचे मोठे धक्के तुर्कीला जाणावले आहे. हे धक्के ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे असून या घटनेत देखील काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची  माहिती मिळत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी तुर्की आणि सीरीया देशात झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जावितहानी आणि वित्तहानी झाली. या धक्क्यातून अद्याप देश सावरलाही नाही असे असतांना या ठिकाणी आणखी भूकंपाचे धक्के बसले आहे.

सोमवारी 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानी तुर्की हादरले. तुर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असून तुर्कीच्या हाते प्रांतात हे धक्के जाणवले. 

या भूकंपामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले. या नव्या भूकंपामुळे 200 पेक्षा अधिक नागरिक हे जखमी झाले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दोन आठवड्यात तब्बल 32 वेळा भूकंपामुळे तुर्की आणि सिरिया हादरले आहेत.

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत 46 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भूकंपामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिरियात परिस्थिती वाईट असून अनेक भागात मदत कार्य पोहचवने देखील कठीण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT