Turkey Economic Crisis: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच, काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या तुर्कीयेलाही महागाईने हैराण केले आहे. तुर्कीयेच्या (Turkey) जनतेला देशातील वाढत्या महागाईचा (Inflation) मोठा फटका बसत आहे. तुर्कीयेची जनता दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करताना दिसत आहे. मार्च महिन्यात तुर्कीयेचा वार्षिक चलनवाढीचा दर 68.5 टक्क्यांवर पोहोचला होता. महागाई एवढी वाढली आहे की, लोकांना दैनंदिन वस्तू घेणेही कठीण झाले आहे.
दरम्यान, परिस्थिती अशी आहे की अन्न आणि निवारा या मूलभूत गरजांसाठीही लोक आता क्रेडिट कार्डवर अवलंबून आहेत. विक्रमी महागाई वाढल्याने लोकांचे पगारही अर्ध्यावर आले आहेत. आता जीवनावश्यक वस्तू खरेदी करतानाही जनतेला दोनदा विचार करावा लागतोय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीयेमध्ये किमान वेतन दरमहा 17,000 लिरा (US$524) आहे, तर दारिद्र्यरेषा 25,000 लिरा (US$768) च्या वर आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जनतेच्या समस्यांचे हे सर्वात मोठे कारण बनले आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ICD) शी संबंधित देशांमध्ये तुर्कीयेत सर्वाधिक चलनवाढ आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, वाढत्या महागाईमुळे तुर्कीयेतील घरांचे रेंटही वाढले आहे. विशेष म्हणजे, पूर्वीपेक्षा दुपटीने हे रेंट वाढले आहे. लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. येथे सर्वाधिक वाढ वाहतूक, खाद्यपदार्थ आणि गृहनिर्माण क्षेत्रात दिसून आली आहे. 2022 मध्ये, तुर्कीयेत महागाईने 24 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. दुसरीकडे, या काळात राष्ट्रपतींनी व्याजदर कमी ठेवण्याच्या धोरणावर भर दिला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी लोन घेणे आणि क्रेडिट कार्ड वापरणे वाढवले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 मध्ये क्रेडिट कार्डचे लोन 2.5 पटीने वाढून सुमारे एक ट्रिलियन लीरा म्हणजेच 34 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे. हा स्वततःच एक रेकॉर्ड आहे. कमी व्याजदराच्या दीर्घ कालावधीमुळे क्रेडिट कार्डचे लोन फेडण्यासाठी पर्सनल लोन घेणे असे प्रकार सुरुच आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.