Recep Tayyip Erdogan Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Election 2023: एर्दोगान पुन्हा एकदा बनले तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग 11व्यांदा जिंकली निवडणूक

Turkey Election 2023: तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

Manish Jadhav

Turkey Election 2023: तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रेसेप तय्यप एर्दोगन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

त्यांनी आतापर्यंत सलग 11 वेळा निवडणूक जिंकली आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या रेसेप तय्यप एर्दोगन यांची विरोधी पक्षनेते केमाल केलिकदारोग्लू यांच्याशी कडवी झुंज होती.

यापूर्वी, 14 मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मते मिळाली नव्हती, त्यामुळे रनऑफ फेरी करण्यात आली होती.

त्यातही आता एर्दोगन यांनी बाजी मारली आहे. एर्दोगन यांना एकूण 97 टक्के मतांपैकी 52.1 टक्के तर केमाल यांना 47.9 टक्के मते मिळाली आहेत.

तमीम बिन हमाद यांनी अभिनंदन केले

एर्दोगन यांच्या विजयावर कतारचे (Qatar) तमीम बिन हमाद यांनी ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, "विजयाबद्दल अभिनंदन, नवीन कार्यकाळात यशासाठी शुभेच्छा".

रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या आश्वासनांवर एक नजर

रेसेप तय्यप एर्दोगन यांनी यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Election) लोकांना अनेक आश्वासने दिली होती, ज्यात भूकंपग्रस्त भागात 6 लाख 50 हजार नवीन घरे बांधणे, महागाई दर 20 टक्क्यांपर्यंत कमी करणे, सध्या 44 टक्के आहे.

यानंतर, त्यात 2024 पर्यंत महागाईचा दर 10 टक्क्यांपर्यंत कमी करणे, सीरियन निर्वासितांना त्यांच्या मायदेशी परत पाठवणे आणि सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी समझोता करणे देखील समाविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT